Tag: मुलुंड
माधव सावरगावकर : जिद्द, कष्ट व हुशारी
माधव सावरगावकर हुशार, चिकित्सक आणि चौकस बुद्धीचे. ते नाशिक जिल्ह्यातील एका तालुक्याच्या गावी मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मले. वडिलांचे रेव्हेन्यू खात्यातील नोकरीचे तुटपुंजे पेन्शन, शेतीचे जेमतेम उत्पन्न... पण कुटुंब सुसंस्कृत होते. माधव यांचे शिक्षण नादारीवर झाले. त्यांची रवानगी मुंबईतील बहिणीकडे झाली. तेथे त्यांना साडेतीन रुपये रोजावर हेल्परची नोकरी मिळाली. तोच आधार घेऊन माधव यांनी कष्ट करण्याचा आणि दररोज नवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास घेतला. तो शिक्षणाचा मंत्र माधव यांच्या पुढील यशाचे कारण ठरला...
साहित्य सम्राट न.चिं. केळकर ग्रंथालय – सोमवार ग्रंथप्रेमाचा!
ग्रंथालयांचे, वाचनालयांचे अस्तित्व हे शहरात सांस्कृतिकपणा जिवंत असल्याचे लक्षण असते. त्यात ते ग्रंथालय दुर्मीळ संदर्भग्रंथांनी समृद्ध असेल तर मौल्यवान पाचू, माणके, हिरेच त्या शहराने...