Home Tags मुचकुंदी नदी

Tag: मुचकुंदी नदी

आमची कशेळी – शहरी वातावरणापासून दूर !

कशेळी हे कोकणातील रत्नागिरीजवळचे जुने प्रसिद्ध गाव. ते कऱ्हाड्यांचे गाव असेही म्हणत. तेथील पाच ‘क’ प्रसिद्ध आहेत, म्हणे. त्यांतील एक ‘क’ कऱ्हाड्यांचा. गावगाथा या ‘थिंक महाराष्ट्र’च्या लोकप्रिय सदरासाठी लेखन शोधत असताना न्यूयॉर्कचे जयंत कुळकर्णी यांच्यापर्यंत पोचणे झाले आणि खजिनाच हाती आला. जयंत स्वतः उत्साही लेखक-संकलक. त्यांचे वडील वि.ह. हे समीक्षक कुळकर्णी वर्गातील. पण वि.ह. ललित लेखनही उत्तम लिहीत. त्या वि.ह. यांनी त्यावेळच्या साहित्यिक समीक्षकांची ट्रीप कशेळीला नेली होती. तिचे वर्णन अनंत काणेकर यांनी करून ठेवले आहे. कुळकर्णी पितापुत्र यांनी कशेळीबद्दल लिहिले आहे...

म्हणतात कुंतीपूरचे झाले कोतापूर ! (From Kuntipur to Kotapur Village)

कोतापूर हे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील डोंगररांगांनी वेढलेले आणि दोन नद्यांच्या मध्यभागी वसलेले छोटेसे निसर्गसंपन्न जुने गाव आहे. कोतापूर हे लहान गाव आहे. लोकवस्ती सुमारे दीड हजार माणसांची आहे. गावाच्या इतिहासासंदर्भात ‘कुतापूर ताम्रपट’ हा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध आहे. त्यात प्राचीन काळातील उल्लेख सापडतात. कोतापूर नावाची दंतकथा आहे. कोकणातील सण-उत्सवांचे वैभव कोतापूरलाही लाभले आहे. जिल्हास्तरीय नासा-इस्रो स्पर्धेत गावातील मुली इस्रो आणि नासा या दोन्ही संस्थांना भेटी देऊन आल्या आहेत...

वाटूळ ! (Watul Village)

विराज चव्हाण यांनी सध्याच्या वाटूळ या गावाची माहिती दिली आहे. त्यासोबत प्राची तावडे यांनी त्यांच्या लहानपणी पाहिलेले गाव, त्या गावच्या रम्य आठवणी असा लेख लिहिला आहे. त्या लेखाची लिंक सोबत जोडली आहे. तुम्हीही तुमच्या गावाची ललित पण वस्तुनिष्ठ माहिती ‘गावगाथा’ दालनाद्वारे जगभर पोचवू शकता. वाटूळ हे नाव वाचताना जरा वेगळे वाटते ना? वाटूळ हे रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील सुंदर गाव आहे. ते मुचकुंदी नदीच्या काठावर वसलेले आहे. गावाचा आकार भौगोलिक दृष्ट्या गोलाकार आहे, म्हणून ते वाटूळ ! त्या बाबत दंतकथाही आहेच...

पूर्णगडावरील आनंदसमाधी

महाराष्ट्राला सातशेवीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. महाराष्ट्राच्या किनारी शंभरएक जलदुर्ग समुद्राच्या लाटांशी गुजगोष्टी करत उभे आहेत. त्यांतील काही ऐन समुद्रात, काही किनाऱ्यावर पाण्यात पाय बुडवून, तर काही काठालगतच्या एखाद्या डोंगरटेकडीवर ठाण मांडून बसले आहेत. त्या समुद्रकिनाऱ्याच्या अंगाने जलदुर्ग संस्कृती निर्माण झाली आहे. दुर्गांच्या त्या माळेतील एक रत्न म्हणजे पूर्णगड ! पूर्णगड हे छोटेखानी गाव आहे. अगदी छोटीशी वस्ती ! गावाच्या पूर्वेला मुचकुंदी नदी आणि तिची पूर्णगड नावाचीच खाडी. रत्नागिरीहून निघालेली वाट या खाडीवरील पुलावरून राजापूर तालुक्यात शिरते...

मुचकुंदी : विशाळगडापासून पूर्णगडापर्यंत !

मुचकुंदी ही कोकणातील नदी. तिला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. तिचा जन्म होतो विशाळगडाजवळ आणि ती समुद्राला मिळते पूर्णगडाशेजारी ! एका गडाजवळ उगम पावत अन्य एका गडाजवळ समुद्रात अंतर्धान पावणारी ही एकमेव नदी असावी. मुचकुंदी नदी अनेक गावांना सुजलाम सुफलाम करत पूर्णगड खाडीत उतरून अरबी समुद्राला मिळते. मुचकुंद ऋषींची गुहा लांजा तालुक्यातील माचाळ या गावात आहे. माचाळ हे गाव ढगांचे माहेरघर, मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. गिर्यारोहक माचाळ-विशाळगड असा ट्रेक करतात...

कशेळीचा कनकादित्य (Kanakaditya the sun temple from Kasheli)

0
सूर्यमूर्ती या भारतात इसवी सनापूर्वी दोन शतकांत घडवण्यात येऊ लागली. सूर्याचे देव म्हणून महत्त्व इसवी सनाच्या चौथ्या, पाचव्या शतकात, म्हणजे गुप्त काळात वाढत गेले आणि उपासना मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कशेळी या गावी ‘कनकादित्य’ नावाने सूर्य मंदिर प्रसिद्ध आहे. ते मंदिर सुमारे एक हजार वर्षे पुरातन आहे. कशेळी गावाजवळ असलेले आडिवरे गाव मुचकुंदी नदीच्या खाडीच्या मुखाशी वसलेले आहे. आडिवरे या नावाची उपपत्ती आदितवाड म्हणजे जेथे सूर्योपासना होती ते गाव अशी असल्याचे पुरातत्त्व खात्याच्या संशोधन पत्रिकेत म्हटले आहे...