Tag: मिरवणूक
दापोलीचा प्रभुआळी उत्सव – परंपरेची मांदियाळी
प्रभुआळी हे दापोली शहराचे मध्यवर्ती ठिकाण. त्या आळीची ख्याती उत्सव, प्रथा-परंपरा यांचा वारसा जपणारा, गजबजलेला भाग म्हणून आहे. प्रभुआळी हे नाव पडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या ठिकाणी प्रधान व सुळे हे प्रभू म्हणजे सीकेपी ग्रामस्थ यांचे वास्तव्य होते. या जुन्या संदर्भाखेरीज दुसरा महत्त्वाचा पदर आहे. तो म्हणजे आळीत असलेले ‘प्रभू’ श्रीरामचंद्राचे मंदिर ...
शिवाजी, रामदास आणि गणेशोत्सव
संतकवी रामदास स्वामी व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना एकमेकांबद्दल आदर होता. लोकांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे, संस्कृती रुजावी यासाठी शिवाजी राजे आणि रामदास स्वामी या दोघांनी मिळून गणेशोत्सव भाद्रपद शुद्ध चार ते माघ शुद्ध पाच म्हणजे गणेश जयंतीपर्यंत, पाच महिने 1675 साली साजरा केला...
मराठवाडा : सण बाई दिवाळीचा राजा
मराठवाड्यातील दिवाळी खास आहे ती काही परंपरांमुळे. रेड्यांच्या टकरी, शेणापासून बनवलेले गोकुळ, म्हशींची मिरवणूक, गाई-म्हशींना ओवाळणे हे सारे कृषिसंस्कृतीतून, लोकसंस्कृतीतून झिरपलेले टिकून आहे...
शिराळशेट (Shiral Sheth – Fictious Character Becomes Part of Folk Festival)
श्रीयाळ शेठ नावाचा अपभ्रंश शिराळ शेट, सक्रोबा, शंकरोबा असा महाराष्ट्राच्या विविध भागांत वेगवेगळा झालेला आढळतो. त्याला औट घटकेचा राजा असेही म्हटले जाते...
कारहुनवी – बैलांची मिरवणूक
जय हनुमान या नावाचे प्रसिद्ध असे मंदिर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात सलगर या गावी आहे. तेथे तीन दिवसांची जत्रा वटपौर्णिमेच्या दरम्यान भरते. त्या जत्रेचे...