संगीत नाटकांचा आलेख हा चढउताराचा आहे. अलिकडच्या काळात जुन्या संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन होत असले तरी त्यात स्मरणरंजनाचा भाग जास्त आहे असे असले तरी नाट्यसंगीताची लोकप्रियता टिकून आहे. शास्त्रीय संगीत गाणारे त्यांच्या मैफलीत नाटकातल्या पदांचा समावेश करतात. जशी शास्त्रीय संगीतात घराणी आहेत तशी नाट्यसंगीतातही घराणी आहेत...
'संयुक्त मानापमान' या संगीत नाटकाचा प्रयोग हे मराठी रंगभूमीवरील एक विलक्षण 'घटित' होते. तो प्रयोग 8 जुलै 1921 रोजी मुंबईच्या बालीवाला थिएटरमध्ये रंगला होता. त्या प्रयोगाला अनेक व्यक्ती, घटना, प्रेक्षकांच्या क्रियाप्रतिक्रिया, निर्माण झालेला माहोल यांचे संदर्भ आहेत...
मराठी संगीत रंगभूमी ही महाराष्ट्रीय मनाच्या मर्मबंधातील ठेव आहे. त्यामुळे पद्याला, संगीतकलेला रंगभूमीचे अधिष्ठान मिळाले आणि तो वेलू जो गगनावेरी गेला, तो अनेक वळणे घेत, चढउतार अनुभवत, आजतागायत लोकप्रियतेच्या किमान पातळीवर राहिला.