Home Tags माण तालुका

Tag: माण तालुका

माणदेश : दंडकारण्यातील प्राचीन भूमी (Maharashtra’s land with ancient history)

मध्य भारतातील विस्तृत पठार हा भारताच्या पाच प्राकृतिक विभागांपैकी सर्वात प्राचीन भूभाग आहे. त्या भारतीय पठारात शंभू महादेव ही डोंगररांग आहे. दंडकारण्य हा भूभाग त्या डोंगररांगेमध्ये आहे. ‘माणदेश’ ही मेंढपाळ धनगर जमातीची भूमी त्यातच येते. ती भूमी पुण्य आहे असे ते मानतात. माणदेशाचे एकूण क्षेत्रफळ अठ्ठेचाळीस हजार सातशे चौरस किलोमीटर आहे. माणदेश हा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर पसरलेला आहे. तो सातत्याने दुष्काळग्रस्त आहे. माण आणि आटपाडी (संपूर्ण तालुके), सांगोला (एक्याऐंशी गावे), मंगळवेढा (बावीस गावे), जत (एकतीस गावे), कवठेमहांकाळ (तेरा गावे) आणि पंढरपूर (बारा गावे) या तालुक्यांचा समावेश माणदेशात होतो...

उपेक्षित सीतामाईचा डोंगर

मकरसंक्रातीचा सण फलटण आणि माण तालुक्यांच्या सीमेवरील सीतेच्या मंदिरात साजरा करण्याची पद्धत न्यारीच आहे ! महिला सीतेची आरती करून, मकर संक्रांतीचे सुगड तिच्या पायाशी अर्पण करून मकर संक्रातीचा सण साजरा करतात. महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो महिला सीतेला सौभाग्याचे वाण देण्यासाठी तेथे येतात. ते सीतामाई देवस्थान सह्याद्रीच्या निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये आहे. तो डोंगर सीतामाईचा डोंगर म्हणूनच ओळखला जातो...
_Injabav_1.jpg

इंजबाव: जलसंवर्धनातून टँकरमुक्तीकडे

दुष्काळग्रस्त माण. मात्र, त्या तालुक्यातील इंजबाव गाव पिण्याच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले आहे. त्याला कारण म्हणजे ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेले जलसंधारणाचे काम. माण तालुक्याला जानेवारीपासूनच पिण्यासाठी...