संतोष लक्ष्मण दगडे हे रायगड जिल्ह्यातील कर्जतचे तरुण गिर्यारोहक 17 मे 2023 रोजी पहाटे एक वाजून पंचावन्न मिनिटांनी एव्हरेस्टवर पोचले ! महाराष्ट्राच्या या युवकाने या पराक्रमामुळे साऱ्या भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग यांच्यासारखे दिग्गज जेथे पोचले तेथे मराठमोळे संतोष जीवाची बाजी लावून पोचले होते...
नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील तरुण अविनाश बावणे याने नौदलाच्या पथकाबरोबर जाऊन एवरेस्ट शिखर सर केले. त्याने तो पराक्रम तीन दिवसांत दोनदा केला- प्रथम एकट्याने व नंतर पुन्हा चमूबरोबर समूहाने. अशी यशसिद्धी असलेला जगातील तो एकटाच...
नागपूरचे आर्किटेक्ट अशोक जोशी नवीन माणूस भेटला की प्रश्न विचारत, तुमचे चरितार्थाचे म्हणजे उपजीविकेचे साधन काय? तो माणूस उत्तर देई, मी पत्रकार आहे किंवा...