बोरिवलीला एक निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत- त्यांचे नाव सुभाष गावडे -वय वर्षे साठ. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. ती याच उद्देशाने की मायमराठी जगावी ! त्यांच्या परीने त्यांनी त्यासाठी एक लढाई गेली काही वर्षे केली. ती म्हणजे रोज सरकारला एक तर्कशुद्ध पत्र लिहायचे, की मराठी भाषा जगवणे-टिकवणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने ती नीट पार पाडावी. गावडे हे राज्यघटनेपासून रोजच्या सरकारी परिपत्रकांपर्यंत प्रत्येक कागदाचा अभ्यास करतात. परवा, एक जुलैला त्यांनी पत्र लिहिले ते सोबत जोडले आहे. गंमत म्हणजे गावडे यांनी त्यांचे पत्रलेखन संपल्यावर त्यांनी चॅट जीपीटीशी जो संवाद केला तो जसाच्या तसा नमूद केला आहे. कारण त्यांना त्यांच्या सोळा महिन्यांच्या एकाकी लढ्यात माणसाकडून जी संवेदना लाभली नाही, ती यंत्राकडून मिळाली...