Tag: मध्य प्रदेश
सातपुड्यातील लोकउत्सव – बहिरम यात्रा
बहिरमची यात्रा म्हणजे दोन राज्यांतील हिंदी व मराठी भाषिक लोकांमधील सांस्कृतिक संगम आहे ! यात्रा मध्य प्रदेश व महाराष्ट्र यांच्या सीमेवर भरते. सलग दीड महिन्यापेक्षा जास्त काळ चालणारी यात्रा म्हणून बहिरमच्या यात्रेचा लौकिक सर्वदूर आहे. यात्रेला पौराणिक महात्म्य आहे. बहिरम (भैरवनाथ) हे बऱ्याच कुटुंबांचे कुलदैवत आहे. यात्रेत देवदर्शनासोबत अध्यात्म, चित्रपट, मनोरंजन, महाप्रसाद, खाद्य संस्कृती, महिला मेळावा, कीर्तन, प्रदर्शन, पशुविक्री, कृषी साहित्य अशी सर्व गोष्टींची रेलचेल राहते...
बहिरम – व्यापाऱ्यांची जत्रा (Bahiram Festival – Different Perspective)
बहिरम यात्रेला विदर्भात मोठे ऐतिहासिक स्थान आहे. ते बैतुल-होशंगाबाद या जुन्या राजमार्गावर येते. तेथील यात्रेचा उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे येतो. कॅप्टन मेडोज टेलरच्या ‘कन्फेशन ऑफ ए ठग’ या पुस्तकामध्ये त्याचे काही संदर्भ सापडतात. बहिरमचे दगडी मंदिर, त्याशी जोडलेली मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ यांची नावे हे सारे भारतीय संस्कृतीचा वेगळ्याच दृष्टीने विचार आणि तत्संबंधी संशोधन करण्यास भाग पाडते...
अमरावतीजवळ अश्मयुगीन चित्रगुहा !
अश्मयुगीन चित्रगुहा अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी नजीक आढळून आल्या आहेत. हे ठिकाण सातपुड्याच्या पायथ्याशी येते. पुरातत्त्व संस्थांनी त्यांची दखल घेतली आहे. पण तरीही त्या दुर्लक्षित राहिल्या आहेत...
अचलपूर येथील गाढवपोळा
पोळा हा सण बैलांचाच, परंतु अचलपूर येथे भोई समाजात गाढवांचा पोळा आयोजित केला जातो. गाढवांप्रती कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे गाढव पोळा होय. ही प्रथा मागील पन्नास-साठ वर्षांपासून परतवाडा शहरातील दयाल घाट येथे जपली जात आहे...