Tag: भुलेश्वरी नदी
परंपरा जपणारे शिंदी बुद्रुक
चक्रधर स्वामी यांचे वास्तव्य लाभलेले, ग्रामदेवता मरिआईची मिरवणूक, 'द्वारकाच्या बैला'ची मिरवणूक, श्रावणात घरोघरी केल्या जाणाऱ्या 'माळी पौर्णिमे'ची पूजा अशा अनेक आगळ्यावेगळ्या प्रथा, परंपरा, उत्सव जोपासणारे, एकेकाळी अजरामर संगीत नाट्यकलावंत घडवून ‘नाटकांची शिंदी’ म्हणून ओळख निर्माण केलेले, 'शिक्षकांचे गाव' अशी वैविध्यपूर्ण ओळख असलेले अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील गाव म्हणजे ‘शिंदी बुद्रुक’...
गाडगेबाबांच्या… बालपणीच्या पाऊलखुणा शोधताना
अमरावती जिल्ह्यातील ‘शेंडगाव’ हे गाडगेबाबांचे जन्मगाव. गाडगेबाबांनी बालवयातील 1876 ते 1884 पर्यंतचा काळ तेथे व्यतीत केला. अमरावती ते शेंडगाव हे अंतर सत्तर किलोमीटरचे. डेबूच्या पाऊलखुणा इतरत्र दिसतात का ते शोधण्यासाठी गावात निघालो असता बाहेर एक तरूण भेटला. तो जानोरकर परिवारातील होता. त्याला गाडगेबाबांविषयी माहिती त्रोटक होती. त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. तो शेती करतो. ज्या गाडगेबाबांनी त्यांचे आयुष्य शिक्षणाच्या प्रचार-प्रसारासाठी खर्ची घातले त्या दस्तुरखुद्द गाडगेबाबांच्या गावात आणि परिवारात शिक्षणाबद्दल ही अनास्था...