Tag: भीमसेन जोशी
भैरवाचे विस्तीर्ण अंगण !
महादेवाचे नाव असलेला भैरव हा राग महादेवासारखाच अनादी अनंत आहे. त्याला आदिरागही म्हटले जाते; कारण मूळ सहा रागांपैकी सर्वात आधी भैरव निर्माण झाला, असेही म्हणतात. त्यामुळेच की काय, गाणे शिकणाऱ्यांकडून सुरुवातीला गळ्याच्या तयारीचा रियाज हा भैरव रागाचे तान, पलटे व अलंकार घोटून घेऊन करवला जातो. अनेक गुरु-शिष्य परंपरांमध्ये पहिला राग किंवा पहिली शिकवलेली बंदिश ही भैरव रागात असते. इतका प्रचलित, सर्वश्रुत राग असूनदेखील मैफलीतील सादरीकरणात भैरवाचे प्रमाण इतर रागांच्या मानाने कमी आढळते...
कारी कारी बादरिया – मल्हार ! (Monsoon clouds and Raga Malhar)
यावर्षी पावसाने कृपा केली आहे. येणाऱ्या सुगीचे स्वप्न पहायला हरकत नाही असा माहोल आहे. ढग दाटून आले आहेत आणि पावसाच्या धारा कोसळत आहेत. या कोसळणाऱ्या धारांचे संगीत म्हणजे राग मल्हार. त्यात पावसाचे सगळे विभ्रम साठलेले आहेत. भीमसेन जोशींचा मल्हार ऐकताना गडगडणाऱ्या ढगांची आणि कोसळणाऱ्या धारांची आठवण येते. मोगरा फुलला या सदरामध्ये सौमित्र कुलकर्णी मल्हार रागाचा परिचय करून देत आहेत. रागाचे स्वरूप स्पष्ट व्हावे आणि अलौकिक गाण्याचा आनंदही मिळावा या दृष्टीने त्यांनी युट्यूब लिंक्स सोबत दिल्या आहेत. अभिजात व आधुनिक संगीताचा मेळ घालून सादर केलेली 'मल्हार जॅम' ही त्यातील एक आगळीवेगळी प्रस्तुती. स्वत: सौमित्र कुलकर्णी यांनीही एक बंदीश गायली आहे. मल्हाराच्या या धारा खचितच आनंददायी ठरतील...
महाराष्ट्र भूषण धर्माधिकारी पितापुत्र
प्रसिद्ध निरूपणकार आप्पा धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला. देशपातळीवर जसा ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तसाच राज्य पातळीवर महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आहे. धर्माधिकारी कुटुंबीयांचे प्रेरक आणि समाजोपयोगी कार्य लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने त्याच कुटुंबासाठी पित्यापाठी पुत्राला असा हा दुसऱ्यांदा पुरस्कार दिला आहे...
कोल्हापूरची शतमानपत्रे : शतकभराचा इतिहास
जी.पी. माळी यांचे ‘कोल्हापूरची शतपत्रे’ हे पुस्तक म्हणजे एक ऐतिहासिक ठेवा आहे. गेल्या शतकभरातील 101 मानपत्रे ‘जशी होती तशी’ दिल्याने त्या त्या काळची शब्दकळ व मानपत्रांतील बदलत गेलेली भाषा लक्षात येते. ती मानपत्रे तो सगळा काळ वाचकापुढे उभा करतील. अभ्यासकांना तो फारच मोठा फायदा आहे...
विद्याधर ओक यांचे श्रुती संशोधन ! (Shruti research by Vidyadhar Oak)
विद्याधर ओक हे पदवीने औषधांचे एम डी डॉक्टर. ते ठाण्यात प्रॅक्टिस करतात. ते संगीत तज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात. ओक यांनी केलेल्या संशोधनात संगीतातील हिंदुस्थानी श्रुती या वैज्ञानिक दृष्ट्या अचूक कशा आहेत ते सिद्ध झाले आणि अनेक गैरसमजही दूर झाले...
शास्त्रीय संगीतास हार्मोनियमची बाधा (Harmonium Mars Classical Indian Music)
मी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शुद्ध स्वरूपात ऐकून, त्याचा खरा आनंद मिळवायचा असेल तर हार्मोनियम हे वाद्य दूर सारावे लागेल. ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला अजिबात योग्य नाही; किंबहुना मारक आहे. ठाण्याचे डॉ. विद्याधर ओक यांच्या ‘बावीस श्रुती’ या पुस्तकामुळे हिंदुस्थानी संगीतातील मोठी त्रुटी लक्षात आली...