भाषिणी हे भारत सरकारचे अनुवादासाठी वापरले जाणारे अॅप आहे. त्याद्वारे बावीस भारतीय भाषांत मोफत अनुवाद करता येतो. भाषिक अडथळ्यांना पार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाद्वारे सुरू आहे. त्याचे नाव राष्ट्रीय भाषा अनुवाद अभियान. भाषिणी हा त्या अभियानाचाच भाग आहे. भाषादान हा भाषिणीचा एक भाग आहे. त्यामार्फत बावीस भारतीय भाषांसाठी ‘क्राउडसोर्स भाषा इनपुट’चा उपक्रम राबवला जात आहे. भाषाप्रेमी व्यक्तींना स्वतःची भाषा तेथे डिजिटल पद्धतीने समृद्ध करण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यातून माहितीचे खुल्या स्वरूपातील भांडार तयार होणार आहे. त्याचा हेतू भारताची भाषिक विविधता सक्षम करणे असा आहे...