Home Tags भारतीय तत्त्वज्ञान

Tag: भारतीय तत्त्वज्ञान

मी हिंदू आहे म्हणजे मी कोण आहे?

हिंदू धर्म हा हत्ती आणि सहा आंधळे यांच्या गोष्टीतील हत्तीसारखा आहे. अंध मनुष्य हत्तीच्या ज्या भागाला हात लावतो तो म्हणजेच हत्ती आहे असे त्या प्रत्येकाला वाटत असते. परंतु लेखकाला हत्तीचे संपूर्ण स्वरूप जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे तो म्हणतो, “मी हिंदू आहे म्हणजे कोण आहे, हे मला अद्याप सापडलेले नाही..."

तत्त्वज्ञानातील सरस्वती शुभदा जोशी (Shubhada Joshi – Professor do Philosophy)

शुभदा जोशी यांचे नाव एकविसाव्या शतकातील बुद्धिमान विदुषी महिलांमध्ये प्राधान्याने घ्यावे लागेल. त्यांनी ‘लोकायत-चिकित्सक’ अभ्यास या विषयात पीएच डी मिळवली. त्यांचे पन्नास शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. तत्त्वज्ञानाचा अर्क प्यायलेल्या शुभदा गेली चाळीस वर्षे अध्ययन-अध्यापनात अखंड कार्यरत होत्या! परदेशातही भारतीय तत्त्वज्ञानाचे बीज पेरणाऱ्या शुभदा जोशी यांची कारकीर्द संस्मरणीय आहे…

जात म्हणे जात नाही!

मुळात जात ही संकल्पना अलिकडची आहे, तरीही या संकल्पनेला इतिहास आहे. म्हणून ती चांगली असो- वाईट असो, तिच्या पाठीमागचा इतिहास पूर्णपणे पुसून टाकणे आपल्याला किंवा कोणालाही शक्य नाही. जात नाहीशी करुया असे म्हणणे, आमच्या मते, शुद्ध वेडेपणाचे आहे. इतिहास पुसला जात नसतो. एक वेळ, तो इतिहासाच्या पुस्तकांमधून काढून टाकता येईल, संगणकाच्या मेमरीमधून ‘डिलीट’ करता येईल. पण तो जित्याजागत्या माणसांच्या मेमरीमधून नाहीसा कसा करणार? विशेषत: त्या पाठीमागे जेव्हा अनेक पिढ्यांच्या भावना दडलेल्या असतात, परंपरा दडलेल्या असतात, पिढ्यानपिढ्या चालत आलेली संस्कृती दडलेली असते, ते डिलीट कसे होणार? आणि तशी जरूरी पण नाही...