धनगरी लोककला संवर्धनासाठी एक दिवसाचे शिबिर कोल्हापूरजवळ कसबा बावडा येथे झाले. धनगरी लोककलांमधील पंचवीसाहून अधिक प्रकार सुमारे अडीचशे कलाकारांनी सादर केले. तो अनोखा व अफाट आविष्कार ठरला. तीन संस्थांनी एकत्र येऊन एवढा मोठा घाट घातला होता. हालमत सांप्रदाय मंडळ (कुपवाड), शिवाजी विद्यापीठाचे राजर्षी शाहू लोक संस्कृती केंद्र आणि कसबा बावडा येथील बिरदेव धनगर समाज मंडळ या त्या तीन संस्था...
अश्मयुगीन चित्रगुहा अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी नजीक आढळून आल्या आहेत. हे ठिकाण सातपुड्याच्या पायथ्याशी येते. पुरातत्त्व संस्थांनी त्यांची दखल घेतली आहे. पण तरीही त्या दुर्लक्षित राहिल्या आहेत...
वडार बोली ही तेलगूमिश्रित आहे. वडार लोक भटकंती करतात, त्यामुळे प्रादेशिकतेचे रंगगंध त्या भाषेला लाभले आहेत. तिला स्वतंत्र लिपी नाही, ती जिवंत मौखिक स्वरूपात आहे. तिचा व्यवहारात सांकेतिक भाषा म्हणूनही वापर होताना दिसतो...
दुर्गवीर ही मुंबईस्थित संस्था. ती गडकिल्ले, मंदिर, जुन्या वास्तू संवर्धन आणि त्यांच्या परिसरातील जनतेचा विकास यासाठी कार्य करत आहे. पण तिला मुंबईची संस्था तरी...
जंगलातून वाट फुटेल तिकडे भटकणे; निसर्गाचे - त्यातील प्राणी-पक्षी-वनस्पती यांचे निरीक्षण करणे; हिमालय कुमाऊंच्या टेकड्या-लेह-लडाख अशा ठिकाणी ट्रेकला जाणे, बाईकवरूनही अनेक सफरी करणे, निसर्गातील...
महाराष्ट्रातील एकशेआठ किल्ले पादाक्रांत करणारा, मुंबई-कन्याकुमारी-मुंबई अशी सायकल भ्रमंती करणारा, तरुणाईने इतिहासाचा मागोवा घ्यावा, इतिहासातून स्फूर्ती घ्यावी यासाठी रायगड जिल्ह्यात छायाचित्रांची प्रदर्शने भरवणारा व व्याख्याने...
अर्जेंटिना हा दक्षिण अमेरिकेतील एक देश, असून, ब्यु नोसआयर्स हे त्याचे राजधानीचे शहर. त्यापासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर, रम्य वनराजीमध्ये हस्तिनापूर नावाचे अर्जेंटिअन नागरिकांनी वसवलेले स्थान...