Tag: बालगंधर्व
परंपरा जपणारे शिंदी बुद्रुक
चक्रधर स्वामी यांचे वास्तव्य लाभलेले, ग्रामदेवता मरिआईची मिरवणूक, 'द्वारकाच्या बैला'ची मिरवणूक, श्रावणात घरोघरी केल्या जाणाऱ्या 'माळी पौर्णिमे'ची पूजा अशा अनेक आगळ्यावेगळ्या प्रथा, परंपरा, उत्सव जोपासणारे, एकेकाळी अजरामर संगीत नाट्यकलावंत घडवून ‘नाटकांची शिंदी’ म्हणून ओळख निर्माण केलेले, 'शिक्षकांचे गाव' अशी वैविध्यपूर्ण ओळख असलेले अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील गाव म्हणजे ‘शिंदी बुद्रुक’...
मराठी भाषा-साहित्य : अचलपूरचे योगदान
अचलपूर तालुक्याने मध्यप्रदेश या हिंदीभाषिक राज्याच्या सीमेवर असतानासुद्धा मराठी भाषा केवळ जगवली नव्हे तर वाढवलीसुद्धा आहे. अचलपूर परिसरातील बोलीचे सौंदर्य, तिचे उच्चारविशेष, रूपविशेष, तिचे आगळेपण भाषातज्ज्ञसुद्धा मान्य करतात. मूळात अचलपूरला मोठी वाङ्मयीन परंपरा लाभलेली आहे. ती मराठी भाषेच्या वृद्धीकरता पूरक ठरलेली आहे...
अचलपूर – आधुनिक नाट्यपंढरी (Achalpur – The origin of Marathi stage)
अचलपूरला समृद्ध नाट्यपरंपरा लाभली आहे. विदर्भातील कालिदास आणि भवभूतींसारख्या नाट्य विभूतींनी नाट्यक्षेत्रात अजरामर कार्य केल्यानंतर तेथे आधुनिक रंगभूमी रुजली. अचलपुरातील बहुतेक नाट्यगृहे ही नाटके सादर करणाऱ्या मंडळांची स्वतःची आहेत. विशेष म्हणजे अचलपूरच्या जुन्या संस्था रंगमंचाची पूजा करताना नाटकांतील स्त्रीपात्रांचीही पूजा करत. कालौघात ती नाट्यगृहे नाहीशी झाली, पण नाट्यगृहांच्या समोरील मंदिरे जोरात चालू आहेत…
दशावतारी नाटक (Dashavtari – Traditional Marathi Theatre Form)
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशेअडतीस दशावतारी मंडळे आहेत. इतर लोककला काळाच्या उदरात गडप होत असताना, दशावतार मात्र अस्तित्व टिकवून आहे. अब्दुल नदाफ सारख्या नव्या नटांमुळे या कलाप्रकाराचे औत्सुक्य वाढत आहे...
मराठी संगीत रंगभूमी- मर्मबंधातील ठेव (Musicals on Marathi Stage – Rich Tradition)
मराठी संगीत रंगभूमी ही महाराष्ट्रीय मनाच्या मर्मबंधातील ठेव आहे. त्यामुळे पद्याला, संगीतकलेला रंगभूमीचे अधिष्ठान मिळाले आणि तो वेलू जो गगनावेरी गेला, तो अनेक वळणे घेत, चढउतार अनुभवत, आजतागायत लोकप्रियतेच्या किमान पातळीवर राहिला.
गायिका-नटी अमीरबाई कर्नाटकी
अमीरबाई कर्नाटकी यांचे चरित्र रहिमत तरीकेरी यांनी कन्नड भाषेत लिहिले. त्यांनी चरित्र-लेखनाच्या निमित्ताने केलेल्या संशोधनाचा आणि इतर चरित्रात्मक गोष्टींचा रंजक आढावा एका कन्नड लेखात...
बालगंधर्वांचे पत्र
माझ्या मुंजीत मला आशीर्वाद देण्यासाठी बालगंधर्व आले होते. माझी मुंज भरवस्तीतल्या ब्राह्मणसभेत होती. मी आठ वर्षांचा असल्याने मला काही कळत नव्हते. बालगंधर्व आले आहेत असे...
गोहराबाई-बालगंधर्व संबंधावर
बालगंधर्व व गोहराबाई यांच्या संबंधावर रवींद्र पिंगे यांनी १९७१ साली सविस्तर माहिती मिळवून लिहिले, ते मूळ कन्नड लेखक - रहमत तरीकेरी (मराठी अनुवाद –...
गोहराबाई कर्नाटकी –शताब्दी आली तरी उपेक्षाच!
बालगंधर्व हे महाराष्ट्राचे दैवत त्यांची प्रेयसी आणि नंतरची बायको गोहराबाई कर्नाटकी हिला कर्नाटकात प्रतिगंधर्व म्हणत. परंतु महाराष्ट्रात मात्र तिचा द्वेष करत. गोहराबांईची शताब्दी चालू...