Tag: बारव
किन्होळा : जालन्यातील शिक्षकांचे गाव
किन्होळा हे हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. या गावामध्ये जवळजवळ पस्तीस व्यक्ती शिक्षक या पदावर असून ‘शिक्षकांचे गाव’ अशी या गावाची ख्याती पंचक्रोशीत आहे. मात्र असे शैक्षणिक वातावरण गावात कशामुळे निर्माण झाले हे सांगता येत नाही. पण यांतील बरीच घरे दोन पिढ्या तरी शिक्षकी पेशात आहेत. गावाला सांस्कृतिक परंपरा लाभली आहे...
बालंबिका देवीचे बालमटाकळी
बालमटाकळी हे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व टोकाला वसलेले जुने गाव. त्या गावाला पूर्वी टाकळी किंवा बोधेगाव-टाकळी असे म्हटले जात असे. त्या शेजारीच बोधेगाव आहे. त्या गावाचे हे जोडगाव गणले जाई. गावाचे ग्रामदैवत बालंबिका देवी. तिच्या नावावरून त्या गावाला बालमटाकळी म्हणू लागले...
यशोगाथा, पाणीदार धोंदलगावची…
वैजापूरमधील धोंदलगावाने गेली पंचेचाळीस वर्षे पाणीटंचाईची झळ सोसली आहे. त्या गावात आनंद असोलकर या जादूगाराने येऊन गावातील नागरिकांना पाणी अडवण्याचे महत्त्व समजावले आणि ते फक्त लोकसहभागातून शक्य आहे ही भावना त्यांच्या मनी बिंबवली...
खांबपिंपरीचे बारववैभव !
नगर जिल्ह्यातील खांबपिंपरी हे गाव म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या मोठा खजिना आहे ! ते गाव पुरातत्त्वीय दृष्ट्या पांढरीच्या टेकाडावर वसलेले आहे. त्या गावातील शिल्पसमृद्ध बारव, शेतात विहिरी खणू लागल्यावर सापडणाऱ्या अनेक प्राचीन वस्तू व घर बांधणीत चार फुटावर पाया खोदल्यावर सापडणारे माणसांचे सापळे या गावाबद्दल अधिकच कुतूहल निर्माण करतात...
राजाळे गावची एकता अभंग
राजाळे गाव सातारा जिल्ह्यात फलटणपासून पूर्वेला बारा किलोमीटर अंतरावर आहे. ते गाव सधन व विकसनशील आहे..समाजप्रबोधन हेच ब्रीद मानून वैचारिक परंपरा असलेले गाव म्हणून राजाळे गाव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे...