Tag: बाणूरगड
रुक्ष, ओसाड बरड : पालखीचा तेवढा विसावा ! (Barren Barad)
माणूस ज्या भूमीत, ज्या गावात-खेड्यात जन्मला त्या भूमीचा एकेक कण त्याला काशी, गया, मथुरा ह्यासम पवित्र-पावन असतो. तेथील काटेरी बोरीबाभळींना त्याच्या हृदयी पाईन-देवदारपेक्षाही वीतभर जास्तच उंची लाभलेली असते ! गाववेशीवरील म्हसोबा, वेताळ अन बिरोबा ही तर त्याची खरीखुरी ज्योतिर्लिंगे असतात ! बरड हे माझे गाव माझ्यासाठी प्रेमाचे तशा प्रकारे आहे. अन्यथा बरड गाव नावाप्रमाणे वैराण, उजाड आहे. ते सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडे आहे. ते गाव पुणे-पंढरपूर ह्या राज्य महामार्गावर फलटणपासून पूर्वेस अठरा किलोमीटर अंतरावर आहे...
बहिर्जी नाईक आणि बाणूरगड (Bahirji Naik and Banurgad)
बाणूरगड हा किल्ला सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यात आहे. तो सांगली शहराच्या उत्तरेला साधारण साठ किलोमीटर अंतरावर येतो. तो भाग माळरानाचा आहे...