अमेरिका दोन आघाड्यांवर लढाई लढत आहे. एक कोरोनाविरुद्ध आणि दुसरी लढाई म्हणता येणार नाही, परंतु नोव्हेंबरमध्ये होणारी अध्यक्षीय निवडणूक. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांत इतक्या गुंतल्या आहेत, की मास्क वापरायचे की नाही याबद्दलची साधी सूचना वैद्यकीय अधिकारी आणि राजकारणी लोक या दोघांकडून दिली जात आहे!