महात्मा गांधी अन् नाशिक यांच्यातील नातं अनोखं आहे. बॅरिस्टर झाल्यानंतर त्या महात्म्याला जातीत घ्यायचं की नाही, यावर त्यांच्या गावी पोरबंदरला जातपंचायतीत झगडा सुरू होता. कुटुंबाचा आग्रह जातीत पुन्हा प्रवेश मिळावा असा होता. म्हणून त्या महात्म्याला 1891 मध्ये गोदावरीत स्नान करावं लागलं होतं. मोहनदास हे महात्मा होण्याच्या प्रवासातील बंडाची ती पहिली ठिणगी नाशिकच्या गोदाकाठावर त्यांच्या मनात भडकली होती...