प्रमोद झिंजाडे यांनी विधवा प्रथेतून होणारी स्त्रीत्वाची विटंबना नष्ट व्हावी यासाठी विधवा प्रथा निर्मूलनाची संकल्पना मांडली. नुसती मांडली नाही तर आचरणातही आणली. त्यासाठी त्यांनी करमाळा तहसील कार्यालय येथे जाऊन, त्यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या पत्नीची सौभाग्यलेणी न उतरता तिला मानसिक आधार द्यावा असे प्रतिज्ञापत्र तयार केले. त्याचेच पर्यवसान हेरवाड ग्रामपंचायतीच्या विधवा प्रथा निर्मूलनाच्या ठरावात झाले...