Home Tags पूर्णगड

Tag: पूर्णगड

आमची कशेळी – शहरी वातावरणापासून दूर !

कशेळी हे कोकणातील रत्नागिरीजवळचे जुने प्रसिद्ध गाव. ते कऱ्हाड्यांचे गाव असेही म्हणत. तेथील पाच ‘क’ प्रसिद्ध आहेत, म्हणे. त्यांतील एक ‘क’ कऱ्हाड्यांचा. गावगाथा या ‘थिंक महाराष्ट्र’च्या लोकप्रिय सदरासाठी लेखन शोधत असताना न्यूयॉर्कचे जयंत कुळकर्णी यांच्यापर्यंत पोचणे झाले आणि खजिनाच हाती आला. जयंत स्वतः उत्साही लेखक-संकलक. त्यांचे वडील वि.ह. हे समीक्षक कुळकर्णी वर्गातील. पण वि.ह. ललित लेखनही उत्तम लिहीत. त्या वि.ह. यांनी त्यावेळच्या साहित्यिक समीक्षकांची ट्रीप कशेळीला नेली होती. तिचे वर्णन अनंत काणेकर यांनी करून ठेवले आहे. कुळकर्णी पितापुत्र यांनी कशेळीबद्दल लिहिले आहे...

कशेळी : उगवत्या सूर्याचे गाव

कशेळी हे उगवत्या सूर्याचे गाव समजले जाते. एका बाजूला पसरलेला अथांग व विस्तीर्ण अरबी समुद्र व दुसऱ्या बाजूला डोंगरात विसावलेले निसर्गरम्य, हिरवेगार असे शांत गाव. लाल मातीची चिरेबंदी कौलारू घरे, बाजूला असलेल्या कळंब्यांच्या विहिरी, गुरांचे गोठे, खोप्या, झोपाळे, शेणाने सारवलेल्या पडव्या व पुढे-मागे प्रशस्त आगर असा गावचा डौलदार थाट. बैलगाड्या हे सर्वांच्या घरचे वाहन असे. कशेळीला भाऊच्या धक्यावरून बोटीने किंवा एसटीने जावे लागत असे. तो अनेक तासांचा खडतर प्रवास असे. बोट मुसाकाजी येथे किंवा पूर्णगड बंदराजवळ लागे...

पूर्णगडावरील आनंदसमाधी

महाराष्ट्राला सातशेवीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. महाराष्ट्राच्या किनारी शंभरएक जलदुर्ग समुद्राच्या लाटांशी गुजगोष्टी करत उभे आहेत. त्यांतील काही ऐन समुद्रात, काही किनाऱ्यावर पाण्यात पाय बुडवून, तर काही काठालगतच्या एखाद्या डोंगरटेकडीवर ठाण मांडून बसले आहेत. त्या समुद्रकिनाऱ्याच्या अंगाने जलदुर्ग संस्कृती निर्माण झाली आहे. दुर्गांच्या त्या माळेतील एक रत्न म्हणजे पूर्णगड ! पूर्णगड हे छोटेखानी गाव आहे. अगदी छोटीशी वस्ती ! गावाच्या पूर्वेला मुचकुंदी नदी आणि तिची पूर्णगड नावाचीच खाडी. रत्नागिरीहून निघालेली वाट या खाडीवरील पुलावरून राजापूर तालुक्यात शिरते...

मुचकुंदी : विशाळगडापासून पूर्णगडापर्यंत !

मुचकुंदी ही कोकणातील नदी. तिला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. तिचा जन्म होतो विशाळगडाजवळ आणि ती समुद्राला मिळते पूर्णगडाशेजारी ! एका गडाजवळ उगम पावत अन्य एका गडाजवळ समुद्रात अंतर्धान पावणारी ही एकमेव नदी असावी. मुचकुंदी नदी अनेक गावांना सुजलाम सुफलाम करत पूर्णगड खाडीत उतरून अरबी समुद्राला मिळते. मुचकुंद ऋषींची गुहा लांजा तालुक्यातील माचाळ या गावात आहे. माचाळ हे गाव ढगांचे माहेरघर, मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. गिर्यारोहक माचाळ-विशाळगड असा ट्रेक करतात...