होट्टल गावाची ख्याती शिवमंदिरांचे गाव म्हणून सर्वदूर आहे. तेथे चार भव्यदिव्य शिवमंदिरे आढळतात- सिद्धेश्वर, रेब्बेश्वर, सोमेश्वर आणि परमेश्वर अशी त्यांची नावे. शिवमंदिरांची उभारणी अकराव्या शतकात झाली. नितांतसुंदर अशा शिल्पकलेने नटलेली अशी ती शिवमंदिरे आहेत. होट्टल ही कल्याणीच्या चालुक्यांची उपराजधानी होती. बदामी ही मुख्य राजधानी होती. होट्टलची बुट्टीजत्रा ही आगळीवेगळी आहे...
आषाढ महिन्यात पडणारा पाऊस, झडीचे वातावरण आणि त्या महिन्याची पौर्णिमा – गुरुपौर्णिमा, तिला विदर्भात ‘आखाडी’ म्हणून संबोधतात. तेथे पुरणपोळी या पदार्थाला खास असे महत्त्व आहे आणि तेथे उर्वरित महाराष्ट्रापेक्षा पोळी करण्याची पद्धतही निराळी आहे...
शिमग्याचे ‘कवित्व’ महाराष्ट्राला नवे नाही. मात्र सिन्नर तालुक्यातील वडांगळी या माझ्या गावात शिमगा साजरा केला जातो, तोच मुळी कवने गाऊन, टिप्परघाई खेळून. तेथे टिप्परघाई...