Home Tags पुणे

Tag: पुणे

भारतातील वैष्णव मंदिरे (Vaishnav Temples in India)

विष्णूचे मूर्तिरूपात पूजन आणि त्यासाठी मंदिरनिर्माण परंपरा भारतीय भूमीवर गेल्या बावीसशे वर्षांपूर्वीपासून दिसून येते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या लोकप्रिय त्रिमूर्तीपैकी विष्णू हा एक. विष्णूचे उल्लेख वैदिक वाङ्मयापासून मिळतात.

रमेश पानसे यांचे स्वप्न आणि शैक्षणिक धोरणाचे सत्य (Panase’s Dream Came True Through Educational...

प्रा. रमेश पानसे ही व्यक्ती नसून स्वतःच एक संस्था आहेत! प्रचंड ऊर्जा, उर्मी, अभ्यास, तळमळ, लोकसंग्रह, कल्पना, उत्साह हे सर्व त्या व्यक्तीजवळ आहे. बालशिक्षणात त्यांचे योगदान प्रचंड आहे. त्यांना शिक्षणऋषीच म्हणता येईल. त्यांनी 2020 साली ऐंशीव्या वर्षात पदार्पण केले आहे...

जलसंपन्न कोंढापुरीचे स्वप्न – धनंजय गायकवाड (Dhananjay Gaikwad’s Dream of Plentyful Kondhapuri)

पुणे-नगर रस्त्यावरील कोंढापुरी गावचे धनंजय गायकवाड. ते गावात पाणीटंचाई भेडसावू लागल्याने खवळले आणि त्यांनी दोन वर्षांच्या अवधीत गावाला जलसंपन्न करून टाकले! म्हणजे ते म्हणाले, की अजून दोन-पाच वर्षें उन्हाळ्यात गावात पाण्याची टंचाई नसेल; परंतु नंतर मे महिन्यातही गावात पाणी असेल! आणि खरोखरच,

गुरव म्हणजे शंकराचे पुजारी (Gurav – ShivShankar’s Speciel Priests)

गुरव जातीची निर्मिती भारतीय समाजात विशिष्ट परिस्थितीत झाली. गुरवकीचा व्यवसाय ग्रामदेवतांची पूजाअर्चा रोज व्हावी, नंदादीप लावला जावा,मंदिराची स्वच्छता राखली जावी या गरजेतून निर्माण झाला व त्यासाठी देण्याच्या सेवामूल्याची तरतूद बलुता पद्धतीत करण्यात आली...

शिवमंदिरातील चौकटची नक्षी (Square Drawing in Shiv Temple)

1
शंकराची मंदिरे ही गावातील वस्तीपासून लांब, वर्दळीपासून दूर, निवांत अशी निसर्गरम्य ठिकाणी असतात. ती दऱ्याखोऱ्यांत, डोंगरमाथ्यांवर, पर्वतांच्या पायथ्यांशी, नद्यांच्या उगमांजवळ, नद्यांच्या संगमांजवळ, समुद्रांनजिक, घनदाट अरण्यांत दिसून येतात. जुन्या शिवमंदिरांत हमखास आढळणारी नक्षी म्हणजे ‘चौकटची नक्षी’ होय.

सुलभा सावंत – एकमेवाद्वितीय गोंधळीण (Sulabha Sawant – Lady in Male Dominated Folk Art)

सुलभा सावंत ‘महाराष्ट्रातील पहिल्या संबळवादक म्हणून ओळखल्या जातात. पहिल्याच का, तर त्या एकमेव स्त्री संबळवादक आहेत. त्यामुळे ‘सुलभा सावंत आणि संबळ हे समीकरणच होऊनच गेले आहे. त्यांचा स्वभाव लहानपणापासून धाडसी.

कै. अरूण साधू स्मृती पाठ्यवृत्ती योजना 2020-21 (Arun Sadhu Memorial Fellowship 2020-21)

1
अरूण साधू स्मृती पाठ्यवृत्ती योजना' ह्यावर्षी अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 ऑगस्ट 2020 आहे. प्रसिद्ध लेखक कै. अरुण साधू यांच्या स्मरणार्थ एका तरुण पत्रकाराला अभ्यासासाठी दीड लाख पर्यंतची पाठ्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी तरुण मराठी भाषिक पत्रकारांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

लॉकडाऊनने दिला ‘उमंग’ला जन्म! (Worldwide Art Competition during Lockdown Period)

लॉकडाऊनअजून दोन-पाच महिने तरी मागेपुढे होत राहील -कधी असेल, कधी नसेल- पण जगभरच्या नागरिकांच्या नशिबी घरी बसणे -घरकाम लवकर सुटेल असे वाटत नाही; त्याचबरोबर अशा एकांतवासात, बंदिवासात - वर्णन कसेही करावे - लोकांनी करण्याच्या विविध गोष्टीदेखील चुकणार नाहीत.

राहतच्या स्नेहप्रेमाने सुखावले लॉकडाऊनमधील कष्टी वाटसरू (Lockdown Period Rahat Center)

नगरच्या 'स्नेहालय'चे गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या संलग्न विविध संस्थांनी एकत्र येऊन नगर-मनमाड रस्त्यावर राहत केंद्राची सुरुवात केली. राहत केंद्रातर्फे परराज्यातील मजुरांच्या नाष्ट्या-खाण्या-पिण्याची-प्रवासाची सोय केली जात आहे. तेथे कार्यकर्त्याना आलेले अनुभव शब्दबध्द केले आहेत अजित कुलकर्णी यांनी...

अपर्णा-विदुर महाजन यांचा ध्यास (Vidur-Aparna Mahajan: Art Loving Couple)

तळेगावचे विदुर आणि अपर्णा महाजन हे जोडपे प्रेमळ आणि लाघवी आहे. ती दोघे विचाराने आणि वृत्तीने वेगवेगळी व स्वतंत्र आहेत, पण परस्परांना पूरक आहेत. विदुर सतारवादक-अभ्यासक-संशोधक-प्रचारक आणि अपर्णा तळेगाव जवळच्या चाकण येथे कला व वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजी विषयाची प्राध्यापक व प्रमुख आहे.