Home Tags पठाणकोट

Tag: पठाणकोट

वर्ष 2025 – अंधारातून प्रकाशाकडे

ज्योती शेट्ये या डोंबिवलीच्या कार्यकर्त्या जम्मू राज्यात जानेवारी 2022 पासून काम करत आहेत. त्या प्रथम ईशान्य राज्ये, नंतर अंदमान व आता गेली तीन वर्षे जम्मू या भागांत स्थानिक मुलांना शिकवण्यात मदत करत असतात. त्यांचा जम्मूचा मुक्काम अतिरेक्यांच्या सततच्या दडपणामुळे अस्वस्थ व असुरक्षित असतो. या वर्षी तर विशेषच. तशात पहलगाम घडले आणि त्यांना तो प्रदेश सोडून परत यावे लागले. त्यांनी त्या परतवारीची हकिगत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’साठी लिहिली आहे. या वर्षीच्या दिवाळीच्या प्रकाशामधील अंधार वाचकांना कसली कसली याद देत राहील ...

आधुनिक हिरकणी – लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर

डॉ. माधुरी कानिटकर यांची लेफ्टनंट जनरल या भूदलातील दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर नियुक्‍ती २०२० मध्ये झाली. त्या समकक्ष पदावर जाणारी पहिली मराठी स्त्री हा बहुमान त्यांना लाभला. त्यांना २६ जानेवारी २०२२ रोजी परम विशिष्ट सेवा मेडल देऊन गौरवण्यात आले. त्या निवृत्तीनंतर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत...