ना.सी. फडके यांचे नाव उच्चारले, की सर्वसामान्य वाचकांना सर्वप्रथम त्यांच्या प्रणयरम्य कादंबऱ्या (दौलत, अल्ला हो अकबर वगैरे अनेक) आणि कथा आठवतात. तद्नंतर त्यांच्या गुजगोष्टी, आचार्य अत्रे यांच्याशी व इतरांशी झालेले वाद आणि त्यांचा ‘प्रतिभासाधन’ हा ग्रंथराज.