नागपूरकरांनी नागपुरातील दीक्षाभूमी व 14 ऑक्टोबर 1956 रोजी पार पडलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या काही स्मृती जपून ठेवल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्या सोहळ्यात बाबासाहेबांनी वापरलेली धम्मकाठी. ती कर्नलबागेतील मेंढे कुटुंबीयांकडे सुखरूप आहे. ती लोकांच्या दर्शनासाठी कर्नलबागेतील आंबेडकर वाचनालयात धम्मचक्र प्रवर्तन दिन, आंबेडकर जयंती वा अन्य तशा प्रसंगी ठेवली जाते...