Home Tags त्र्यंबकेश्वर

Tag: त्र्यंबकेश्वर

कोळबांद्र्याच्या डिगेश्वराचा आनंदोत्सव !

1
भारताच्या सात लाख खेडेगावांमध्ये महादेवाचे मंदिर नाही असे गाव नसेल ! महादेवाच्या त्या मंदिरांतील भगवंताचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गावातील महादेवाला वेगवेगळे नाव आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे महाराष्ट्राच्या पोलिस खात्याचे घोषवाक्य आहे. कोळबांद्रे गावातील डिगेश्वरही नेमके तेच काम करतो. गावात कोणी गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल माणसाला त्रास दिला तर ‘आता डिगेश्वराला नारळ देईन’ एवढे वाक्य जरी त्या गरीब माणसाने उच्चारले तरी तो दुष्ट घाबरून जातो...

नाशिकचे योग विद्या धाम

बाळासाहेब लावगनकर यांनी ‘योग विद्या धाम’ या संस्थेची स्थापना जगभर योगशास्त्रासारख्या महत्त्वाच्या विषयाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने 1960 साली केली. सध्या योगाचार्य विश्वास मंडलिक हे योगशास्त्राचा प्रचार करत आहेत. संस्थेचे मुख्य केंद्र नाशिक येथे आहे. तेथे योग विद्यापीठ व ‘विश्वयोग दर्शन’ हा योग आश्रम बांधला आहे. त्या ठिकाणी गुरुकुल पद्धतीने योगाचे निवासी वर्ग चालतात...

‘निबंधमाला’कार विष्णुशास्त्री चिपळूणकर : व्यक्तिवेध

विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आधुनिक मराठी गद्याचे जनक आणि मराठी भाषेतील श्रेष्ठ ग्रंथकार होत. त्यांना ‘सामाजिक सुधारणेचा वाहता झरा’ ही उपमा दिली गेली. त्यांचे ‘निबंधमाला’ हे नियतकालिक फार गाजले. त्यांना अवघे बत्तीस वर्षांचे आयुष्य लाभले होते. तेवढ्या अल्प आयुष्यात त्यांनी साहित्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान अजोड आहे...