Tag: त्रिपुरारी पौर्णिमा
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर
पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पूर्व क्षितिजावर आलेला चंद्र आकाशात वर येऊ लागतो आणि पूर्वाभिमुख असलेल्या कोपेश्वर मंदिरावर त्याची किरणे पडू लागतात. मंदिर शुभ्रधवल चंद्रप्रकाशाने उजळू लागते. शरद ऋतूमधील आल्हाददायक चैतन्यमय वातावरण आणि त्रिपुरी पौर्णिमेचे टिपूर चांदणे उल्हसित करणारे भासते. त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री तारकाकृती मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या छतावरील वर्तुळाकार झरोक्यातून चंद्रकिरण मंदिरात आत प्रवेश करतात. झरोक्याखाली असलेली रंगशिळा चंद्रप्रकाशात उजळून जाते. वर्षातून एकदा, फक्त त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री काही घटिकांपुरता होणारा हा सोहळा कोपेश्वर मंदिराचे सौंदर्य अंतर्बाह्य खुलवतो. हे प्राचीन शिव-विष्णू मंदिर शिल्पकृतींनी संपन्न आहे...
कोळथरे गावचा कासव जलार्पण सोहळा !
कोळथरे हे स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले दापोली तालुक्यातील गाव ! तेथील समुद्र हा पर्यटकांच्या आकर्षणाचा भाग आहे. ते गाव दाभोळमधील बुरोंडीच्या पुढे मुख्य रस्त्यापासून खाली, समुद्रकिनारी वसलेले आहे. तेथील पंचनदी ही छोटीशी नदी जेथे समुद्राला मिळते तेथील परिसर निसर्गरम्य आहे. भारताच्या क्रिकेट संघातील एके काळचा जलदगती गोलंदाज अजित आगरकर यांचे कोळथरे हे गाव...
सामुदायिक आनंदाची नाशिकची दिवाळी
नाशिक हे मंदिरांचे गाव. तेथे असंख्य आळ्या, पेठा नि वाडे. तेथे ‘दिवाळी तोंडावर आली’ हा शब्दप्रयोग ऐकू येई तो भाजणीच्या खरपूस वासानं ! पूर्वी देवदिवाळी ही नाशिकची खरी खासीयत. श्रद्धा असणारे भाविक नाशिक या मंदिराच्या गावात दिवाळीत आले की हात जोडतात नि अप्रूपाने त्रिपुरी पौर्णिमेला एक पणती प्रवाहात सोडतातच...
हिंदळे येथील कार्तिकस्वामी मंदिर (Kartikswami Temple at Hindale in Sindhudurg)
कार्तिकेय देवतेचा उल्लेख वेदवाङ्मयात अपवादाने आढळतो. मात्र तो अनेक पुराणांतून दिसतो. त्याची मंदिरे महाराष्ट्रात तुरळक आहेत, मात्र ती देशाच्या दक्षिण भागात सर्वत्र दिसतात...