Tag: तमाशा
आद्य तमाशा कलावती – पवळा हिवरगावकर (The first lady Tamasha artist -The beautiful Pawalabai)
मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरच्या आवारात लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्या गर्दीला कारणही तसे होते. थिएटरचे मालक अबुशेठ यांनी तमाशा रसिकांसाठी एक आगळावेगळा प्रयोग केला होता. थिएटरच्या आवारात एका छान सजवलेल्या राहुटीत पठ्ठे बापुराव आणि पवळाला नटूनथटून बसवले आणि त्यांना बघण्यासाठी तिकिट ठेवले ! मुंबईतील प्रेक्षकांना त्या जोडीबद्दल मोठी उत्सुकता होती. त्यामुळे लोकांनी रांगा लावून तिकिटे काढली. त्यांनी राहुटीत प्रवेश केला, की त्या दोघांना डोळे भरून बघायचे आणि दोन्ही हात जोडून नमस्कार म्हणायचे. बापुराव आणि पवळा यांनी हलकेसे स्मित जरी केले तरी बघणाऱ्याला धन्य वाटे. कलाक्षेत्राच्या इतिहासात केवळ कलाकाराला बघण्यासाठी तिकिट लावण्याचा प्रयोग एकदाच झाला, आधुनिक तमाशासृष्टीचे जनक बापुराव आणि तमाशासृष्टीतील पहिली स्त्री कलाकार पवळाबाई यांना ते भाग्य लाभले...
गंधर्वतुल्य गायन करणारे नट – भाऊराव कोल्हटकर
मराठी रंगभूमीवरील गायक नट म्हणून भाऊराव कोल्हटकर हे त्यांच्या ‘शकुंतला’, ‘सुभद्रा’, ‘मंथरा’ या त्यांनी साकारलेल्या स्त्रीभूमिकांमुळे विशेष गाजले. परंतु पुढे, त्यांनी ‘सुभद्रे’चा अपवाद वगळता 1889 सालानंतर मुख्यत्वे पुरुष भूमिका साकारल्या त्या अखेरपर्यंत. भाऊराव त्यांचा मधुर गळा, त्यांचे सौंदर्य आणि त्यांचा उत्तम अभिनय यांमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोचले…
गोविंद वल्लभ पंत यांचे ओंड (Ond of G.V. Pant)
भारताचे पहिले गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत व नामवंत साहित्यिक कृ.पां. कुलकर्णी हे ओंड या गावचे सुपुत्र. या गावाची पदवीधरांचे गाव म्हणून ओळख आहे...
हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक – साध्वी बन्नोमाँ जत्रा
बोधेगाव येथे भरणारी साध्वी बन्नोमाँ जत्रा हिंदु-मुस्लिम लोक एकत्र येऊन साजरी करतात. दोन्ही समुदायांचे ते श्रद्धास्थान आहे. ती जत्रा १८९८ सालापासून नियमितपणे भरत आहे. अठरापगड जातीच्या लोकांमुळे अनेक प्रकारचे वैविध्य त्या एकाच जत्रेत एकवटलेले आढळते...
मराठी संगीत रंगभूमी- मर्मबंधातील ठेव (Musicals on Marathi Stage – Rich Tradition)
मराठी संगीत रंगभूमी ही महाराष्ट्रीय मनाच्या मर्मबंधातील ठेव आहे. त्यामुळे पद्याला, संगीतकलेला रंगभूमीचे अधिष्ठान मिळाले आणि तो वेलू जो गगनावेरी गेला, तो अनेक वळणे घेत, चढउतार अनुभवत, आजतागायत लोकप्रियतेच्या किमान पातळीवर राहिला.
तमासगिरांच्या मुलांना सेवाश्रमचा आधार
तमाशा कलावंत तुटपुंज्या मानधनावर तमाशांच्या फडात काम करत असतात. तमाशा कलावंतांच्या पुढील पिढीच्या आयुष्याचा ‘तमाशा’ होऊ नये यासाठी ब्रह्मनाथ येळंब (ता. शिरुर जि. बीड)...
पेट्रा शेमाखा – फॉरिनची पाटलीण
गोऱ्या कांतीची, हिरवट डोळ्यांची, पिंगट केसांची पेट्रा... गावरान सौंदर्य लाभलेल्या लावण्यवतींच्या घोळक्यात वेगळी उठून दिसणारी ती फॉरिनची मेम. जर्मनीची पेट्रा शेमाखा. मराठी मातीतील ढोलकीफड...
खडीगंमत आणि दंडार
खडीगंमत हे लोकनाट्य विदर्भातील नागपूर , बुलढाणा जिल्ह्यांपासून पूर्वेकडील गोंदिया जिल्ह्यापर्यंत सादर केले जाते. विदर्भाच्या प्राचीन लोककलांमध्ये ‘खडीगंमत’ याप्रकाराचा समावेश होतो. दंडार हादेखील लोकनाट्याचा प्रकार आहे. डफगाणे हे मूळ...
खडीगंमत
'तमाशा 'ला एकेकाळी खडीगंमत म्हटले जायचे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी या भागांत तमाशा प्रसिद्ध आहे. उत्तर महाराष्ट्रात तखतरावाचा तमाशा आहे. संगीतबारीचा तमाशा...