Tag: डॉ. तात्याराव लहाने
ठाणे कट्ट्याचे इवलेसे रोप… (Thane Park Discussion Group grows bigger along with the time)
संपदा वागळे आणि त्यांच्या मैत्रिणी यांनी एकत्र येऊन ठाण्यात ‘आचार्य अत्रे कट्टा’ सुरू केला. त्यांनाही त्यांच्यातील अनभिज्ञ असलेल्या विचारांची, क्षमतेची ओळख त्या कट्ट्याने करून दिली. त्या कट्ट्याने त्यांना नवे विचार दिले, माणसे दिली, मैत्र दिले, अनुभव दिले आणि प्रसिद्धीही दिली. अशा त्या सुसंस्कृत कट्ट्याची ओळख लेखाद्वारे करून घेणार आहोत...
बदनापूर तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याचे ध्येय…! (Devesh Pathrikar aims to have Badnapur cataract free)
देवेश पाथ्रीकर हे आहेत बदनापूर येथे मानसशास्त्राचे प्राध्यापक, पण त्यांनी वसा घेतला आहे तालुका मोतिबिंदू मुक्त करण्याचा. ते तालुक्यातील गावोगावी नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करून राहिले आहेत. डोळ्यांचा रोगी सापडला, की ते त्याला जरुरीप्रमाणे ‘औषधी-ड्रॉप्स’चे विनामूल्य वाटप करतात अथवा ऑपरेशनसाठी हॉस्पिटलात नेतात. त्यांचा प्रत्येक आठवड्याचा कार्यक्रम लागलेला असतो. त्यात मोतिबिंदूचे निदान असलेल्या रूग्णांवर थेट मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना घरपोच सोडले जाते...
कुटुंब रंगलंय नेत्रदानात!
मी वैयक्तिक पातळीवर १९८१च्या सुरुवातीस कल्पाक्कम, तमिळनाडू येथे नेत्रदान प्रचार-प्रसार कार्यास सुरुवात केली. आमच्या घरात कोणाला अंधत्व आले किंवा अंधत्व घेऊनच कोणी जन्माला आले म्हणून नाही. माझे वास्तव्य...
डॉ. लहाने यांची जीवनदृष्टी
डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राने योजलेल्या त्यांच्या डोंबिवलीतील व्याख्यानात त्यांची बालपणापासूनची कहाणी सांगितली. ते किती कठीण परिस्थितीतून या पदापर्यंत पोचले ते ऐकले की आपण स्तिमित होतो. मग मनात येते, की आपण आपल्या अडीअडचणी, संकटे यांचा उगाच बाऊ करतो. त्या किरकोळ व तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. आपल्याला लहाने यांच्यासारख्यांच्या जीवनाकडे बघून जीवन जगण्याचा उत्साह-उमेद मिळतात. जीवन समरसून कसे जगावे हे कळते. सर्वसामान्य माणसांना ही माणसे मार्गदर्शक वाटतात...
डॉ. तात्यासाहेब लहाने
नेत्ररोगतज्ञ झाल्यावर सर्व संकटांचा नि:पात झाला असे ते म्हणत असतानाच दुदैवाचा नवा अवतार त्यांच्या समोर उभा ठाकला. डॉ. लहाने ह्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या! आयुष्याचे फक्त एक वर्षं शिल्लक आहे अशी घंटा वाजली होती...