Home Tags ठाणे

Tag: ठाणे

एकमेवाद्वितीय ‘गोंधळीण’

“९८.............” एकेक आकडा सावकाशपणे उच्चारत संपूर्ण मोबाइल नंबर सांगून झाला आणि समोर उपस्थित बहुतेक जणींनी तो भारावल्या अवस्थेत लिहून घेतला. महिला-मेळाव्यानिमित्त बहुसंख्येने एकत्र आलेला...
‘व्यासपीठ’तर्फे आयोजित ‘शिक्षण आणि सुजाण नागरिकत्व’ या कार्यक्रमात योगेश देसाई (कारागृह अधीक्षक, ठाणे), अभय ओक (न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई) व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ

‘व्यासपीठ’ शिक्षक प्रेरित होईल?

 शैक्षणिक गुणवत्तेच्या विकासासाठी प्रेरणा-प्रबोधन-प्रयत्न अशी संकल्पना ठरवून, त्यासाठी शैक्षणिक घटकांचा म्हणजे शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा विकास करण्याचा प्रयत्न करणे हे ध्येय ठरवून ‘व्यासपीठ’च्या...

समस्या मतिमंदांची नव्हे; त्यांच्या पालकांची!

'अपंग' ही संज्ञा अंध, मूकबधिर, बहुविकलांग, मतिमंद इत्यादी सर्वांसाठी वापरली जाते, पण मतिमंदत्व व अन्य प्रकारचे अपंगत्व यांत खूप फरक आहे. अन्य प्रकारच्या अपंगत्वात अपंग व्यक्तीस आपल्या अपंगत्वाची जाणीव असते. त्यावर मात करून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा तिचा प्रयत्न असू शकतो. ते शिक्षण, प्रशिक्षण, अन्य व्यक्ती व संस्था यांची मदत मिळवून अंशत: तरी स्वावलंबी होऊ शकतात. मतिमंदांच्या बाबतीत तसे होत नाही. त्यांना आपल्यात काही उणीव आहे याची जाणीव-बोध नसतो. मतिमंदत्व जर तीव्र असेल तर भोजन, स्वच्छता, संरक्षण या गोष्टीही पालकांनाच कराव्या लागतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतिमंदत्वाचे प्रमाण कितीही असले तरी अशा व्यक्तींची काळजी कायम दुस-यांना घ्यावी लागते...

‘सदाशिव’ त्रिमुखी मूर्ती

'सदाशिव' त्रिमुखी मूर्ती;एक हजार वर्षांपूर्वीची.. ठाण्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शिलाहारकालीन त्रिमुखी शंकराची मूर्ती सापडली आहे. खोपट-माजिवडा रस्त्यावरील सर्व्हिस रोडवर गोल्डन पार्क परिसरात नव्या इमारतीचे बांधकाम सुरू...
carasole

मतिमंदांचे ‘घरकुल’

मतिमंदांसाठी आपापल्या परीने कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील संस्थांपैकी एक म्हणजे, डोंबिवलीजवळच्या 'खोणी' या गावातील 'अमेय पालक संघटने'ने उभे केलेले 'घरकुल'. स्वत:च्या मतिमंद मुला-मुलींसाठी काही पालक मंडळी...