नाटक, दशावतार, भारूड, कीर्तन असे कोणतेही नवनवे कलाप्रकार एकाएकी जन्माला आलेले नाहीत. त्यांना पूर्व परंपरा आहे. ते घटक आणि काळाबरोबर विकसित होत असलेल्या नवनवीन कल्पना यांच्या एकत्रीकरणातून नवे ताजे काही जन्माला येते...
टाळ हे घनवाद्य आहे. द्रोणाच्या आकाराचे दोन पितळी तुकडे असतात. ह्या तुकड्यांच्या मधोमध थोडा फुगवटा असतो. फुगवट्याच्या मधोमध छिद्र पाडून त्यातून दोर ओवतात...