Tag: जगन्नाथ शंकरशेठ
मनमाड आणि गुप्तसर साहिब गुरुद्वारा
महाराष्ट्रातील नांदेड खालोखाल मनमाडमधील गुरुद्वाराला अखिल शीख समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे असे स्थान आहे. ते गुरुद्वाराला प्रेरणा आणि प्रार्थना स्थळ म्हणून फार मानतात. गुरु गोविंद सिंह नांदेड येथे का आले असावेत याबाबत दोन मतप्रवाह आढळून येतात. एक म्हणजे, महाराष्ट्रातील संत नामदेव यांचे पंजाबमधील महत्कार्य आणि त्यांना तेथे, पंजाब प्रांतात मिळालेला ‘संत शिरोमणी’ असा दर्जा. यांमुळे गुरू गोविंद सिंह संत नामदेवांच्या मूळ स्थानी, नांदेडमध्ये आध्यात्मिक किंवा धार्मिक कारणामुळे आले असावेत असे मानले जाते...
रावसाहेब मंडलिक – अव्वल इंग्रजी अमदानीतील रामशास्त्री
माणूस एखाद्या वैशिष्ट्यानेही अमर होऊन राहतो ! मूळ दापोलीचे रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक यांच्या येण्याजाण्यावरून लोक घड्याळ लावत असत ! ‘मंडलिकी टाइम’ अशी संज्ञाच दापोलीत प्रसिद्ध होती ! रावसाहेब मंडलिक आले की समारंभाची वेळ झाली असे समजले जाई. रावसाहेबांनी ज्यांच्यासमोर वकिली केली त्या न्यायाधीशांनाही वेळेच्या बाबतीत सवलत नसे...
गिरगावची दिवाळी – फराळ, अंघोळ, आकाशकंदिल…
पाठारे प्रभू ज्ञातीचे वास्तव्य दक्षिण मुंबईत प्राधान्याने होते. ते स्वतःला अस्सल मुंबईकर मानतात. त्या ज्ञातीमध्ये वर्षभर सर्व सण धूमधडाक्यात साजरे करण्याची परंपरा आहे. दिवाळीत पाठारे प्रभू पद्धतीचे सुकडी, तवसे, शिंगडी, भानवले, पंगोजी, मुम्बरे, बुंदीचे कडक लाडू असे पदार्थ केले जात. त्यांच्या पारंपरिक पदार्थांबरोबरच तेथील विशिष्ट प्रकारच्या रांगोळ्या प्रसिद्ध होत्या. असे म्हणतात, की त्या रांगोळ्या बघण्यास त्या काळी ब्रिटिश अधिकारी घोडागाडीतून येत...