केळशीच्या महालक्ष्मी मंदिराचा उत्सव खूपच मोठा असतो. मंदिर हा पेशवेकालीन वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. उत्सवास केवळ धार्मिक स्वरूप नाही; तर त्यातून केळशी गावाचे समाजजीवन प्रतिबिंबित होते. उत्सव चैत्रशुद्ध अष्टमी ते पौर्णिमा या कालावधीत होतो.
स्वतःमधील क्षमतांचा परिचय करून घेणे, त्या दिशेने पुढे चालणे व जीवन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण करणे म्हणजे शिक्षण ! ते शिक्षण नर्मदाघाटीत मेधा पाटकरांच्या जीवनशाळा देतात. त्यांच्या या उपक्रमामुळे मुले हातात शस्त्र न घेता जीवनशाळांमध्ये जाऊन शिक्षण घेत आहेत. योग्य शिक्षण, योग्य मार्गदर्शन कशा प्रकारे समाजाची उन्नती साधू शकते हे जीवनशाळेला भेट दिल्यावर जाणवते...
राजाळे गावात मंदिरे जरी अनेक असली तरी जानाई देवीचे स्थान अनन्य आहे. मंदिरामुळे गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. भाविक श्री क्षेत्र राजाळे नगरीत कर्नाटक, विजापूर, अहमदनगर, परभणी, बीड, चंद्रपूर या ठिकाणांहून येत असतात...
राजाळे गाव सातारा जिल्ह्यात फलटणपासून पूर्वेला बारा किलोमीटर अंतरावर आहे. ते गाव सधन व विकसनशील आहे..समाजप्रबोधन हेच ब्रीद मानून वैचारिक परंपरा असलेले गाव म्हणून राजाळे गाव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे...