माणसाच्या बाबतीत, माय स्वत:च्या बाळाला अंगावर दूध पाजते. बाळाला ती स्तनपान करते. निसर्गाने बाळासाठीच आईच्या शरीरात ती योजना केली आहे. मग गाय, म्हैस यांचेही दूध, खरे तर, त्यांच्या बाळांसाठीच असण्यास हवे ना ? परंतु आधुनिक काळात भावना नष्ट होत आहेत...
चौगाव गावी दिवाळीला कोणत्या हेल्यांची टक्कर लावायची हे आधीच ठरवलेले असायचे. ठरावीक लोकांकडचे हेले टक्करीसाठी तयार केलेले असायचे. सुरुवातीस, दोन्ही हेले एकमेकांचा अदमास घेत एकमेकांभोवती फिरायचे. शेवटी, एकमेकांचे डोके एकमेकांना भिडायचे. लोक हुर्यो करून ओरडायचे. हेल्यांना चेव चढायचा. कोणी डोक्याची ताकद वापरायचा तर कोणी शिंगांचा वापर करायचा...
मोराणे सांडस हे माझे आजोळ; म्हणजे मामाचे गाव. ते नाशिक जिल्ह्याच्या सटाणा (बागलाण) या तालुक्यात आहे. मोराणे हे फड बागायती असणारे संपन्न गाव होते. हे टुमदार खेडे मोसम नदीच्या तीरावर वसले आहे. ते सटाणा या तालुक्याच्या गावापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे...
दिवाळीच्या दिवसांत, गाई-म्हशींना ओवाळण्याची पद्धत आमच्या चौगांवमधे माझ्या लहानपणी होती आणि मी स्वतः काही वर्षे गाई–म्हशींना ओवाळण्याचे काम केले आहे. #चौगाव हे धुळे जिल्ह्यात त्याच नावाच्या तालुक्यात आहे. माळी समाज हा इतर समाजांपेक्षा जास्त पुढारलेला समजला जाई. दूध देणारे पशू हे आमच्या समाजासाठी देव होत. म्हणून गाईगुरांना विशेष मान आमच्या गावात दिवाळीच्या सणाला असायचा. दिवाळी हा जसा भाऊबहिणीचा सण असतो तसा तो आमच्या गावात गाई-म्हशींचापण सण असायचा...