महाराष्ट्रातील मराठवाडा हा भाग स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत येत होता. देशात इतरत्र लोक परकीयांविरूद्ध लढत असताना मराठवाड्यातील जनतेला स्वकीयांच्या अत्याचाराला तोंड द्यावे लागत होते. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ या स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाड्यातील जनतेत त्या विरूद्ध जागृती निर्माण केली. त्या लढ्यात ग्रामीण भागातील एक अतिशय धाडसी महिला सहभागी झाली होती. तिचे नाव होते दगडाबाई देवराव शेळके...