Tag: चरित्र
सरोजिनी वैद्य : संशोधनाची नवी वाट
सरोजिनी वैद्य या लेखक व समीक्षक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. एकोणिसाव्या शतकात जेव्हा संशोधन सामग्री अपुरी होती, त्या काळात संशोधनाच्या नव्या वाटा धुंडाळून त्यांनी भोवती वलय नसलेल्या व्यक्तींवर लिहून त्यांचे कार्य प्रकाशात आणले. त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक विचारांची घुसळण आत्मीयतेने शब्दबद्ध केली. ज्येष्ठ लेखिका विनया खडपेकर यांनी सरोजिनी यांच्या साहित्यिक कारकीर्दीचा आढावा या लेखात घेतला आहे...
विश्वचरित्र कोशकार – श्रीराम कामत
श्रीराम कामत हे ‘विश्वचरित्रकोशाचा अखेरचा खंड’ आणि ‘बोरकरांचे समग्र साहित्य प्रकाशन’ असे दोन प्रकल्प वर्षभरात पूर्ण करून निवृत्त होणार होते; पण, तोच मृत्यूने त्यांच्यावर...
ऋणानुबंध मालतीबाई बेडेकर यांचा (Maltibai Bedekar)
मालतीबाई बेडेकर यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1905 आणि निधन 6 मे 2001. पंच्याण्णव वर्षांचे आयुष्य. त्यांची लेखणी कथा, कादंबरी, संशोधन अशा सर्व लेखन प्रकारांत यशस्वीपणे फिरली होती. त्यांनी अनेक परिषदांची, संमेलनांची अध्यक्षपदे भूषवली होती. त्यांना बरीच पारितोषिके पुरस्कार मिळाले होते...
स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक (Smrutichitre – Laxmibai Tilak)
रेव्हरंड टिळक अर्थात नारायण वामन टिळक हे मराठीतील प्रसिद्ध कवी. त्यांच्या पत्नीने - लक्ष्मीबाई यांनी लिहिलेले अविस्मरणीय आत्मकथन ‘स्मृतिचित्रे’ या नावाने प्रसिद्ध आहे. या पुस्तकात हिंदू संस्कारांमध्ये वाढलेली स्त्री बदलत कशी जाते आणि तिचा विकास कसा होतो याचा आलेख दिसतो...
पुरातत्त्वभूषण कै. इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र
साने गुरुजी यांचे नाव घेतले की आठवते ती ‘श्यामची आई’ आणि त्या पाठोपाठ ‘साने गुरुजी कथामाला.’ आणखी थोडी माहिती असलेल्यांना आठवते ते त्यांचे ‘भारतीय...
पण्डिता रमाबाई सरस्वती – प्रबोधनकार के.सी.ठाकरे
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे बहुसंख्य वाचकांना शिवसेनेप्रमुखांचे वडील म्हणून ठाऊक असावेत. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे वडीलही ‘हिंदुत्व’वादी असतील असा समज सर्वसाधारणपणे होऊ शकतो. आणि मग...