Tag: ग्रामविकास
सुनंदाताई पटवर्धन – एक प्रेरणास्थान
सुनंदाताई पटवर्धन यांच्या दुःखद निधनाची (10 जानेवारी 2024) बातमी वाचली आणि हृदयाचा एक ठोका चुकला. सुनंदाताई आणि माझा संपर्क पंधरा वर्षांहून अधिक काळचा. मी रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बन आणि प्रभाकर फाऊंडेशन यांचा प्रतिनिधी म्हणून 2007 च्या सुमारास सुनंदाताई आणि त्यांच्या ‘प्रगती प्रतिष्ठान’ संस्थेच्या संपर्कात आलो. सुरुवातीला जव्हार-मोखाडे भागात आदिवासी मुलांना सायकल वाटप, महिलांना घरघंटी वाटप अशा उपक्रमांतून सुनंदाताई यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली...
राजा-रेणू दांडेकर – चिखलगावचे ध्येयप्रेरित जोडपे
राजा दांडेकर हे दापोली तालुक्यातील चिखलगावचे. त्यांनी शिकून- डॉक्टर होऊन परत स्वत:च्या गावी यायचे ठरवले होते. ते ध्येयवादाने झपाटलेले व्यक्तिमत्त्व. भारताचा इतिहास व भारतीय संस्कृती यांच्यावरील प्रेम त्यांच्यात ठासून भरलेले आहे. त्यांनी लोकसाधना संस्थेच्या माध्यमातून शाळा काढली. तेथे शासनाचा अभ्यासक्रम सांभाळून प्रत्येक मुलाला प्रयोगशील उत्पादक शिक्षण कसे देता येईल असा प्रयत्न असतो...
झरी गावी ‘एक गाव एक स्मशानभूमी’ (Zari village will have one crematorium for all...
साधारणपणे स्मशानभूमी म्हटले की सर्वांच्या डोळ्यांसमोर येते ते चित्र म्हणजे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी उभारलेले पत्र्याचे शेड आणि त्याच्या आजूबाजूला वाढलेली झाडेझुडपे ! पण मृतदेहावर अंत्यसंस्कार स्वच्छ, सुंदर परिसरात करणारी एक वेगळी स्मशानभूमी परभणी जिल्ह्यातील झरी या गावी आहे. झरीतील त्या स्मशानभूमीला आयएसओ (ISO) मानांकन प्राप्त झाले आहे...
कुमारप्पा यांचा अनोखा अर्थविचार
कुमारप्पा हे शाश्वत, पर्यावरणस्नेही, न्याय्य व अहिंसक अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते, गांधीवादी विचारवंत होते. त्यांनी शाश्वत, सर्वसमावेशक व विकेंद्रित विकासाची संकल्पना ऐंशी वर्षांपूर्वी मांडली. कुमारप्पा यांनी सुचवलेला मार्ग अधिक शहाणपणाचा व शाश्वततेकडे नेणारा आहे.अक्षय ऊर्जेच्या मदतीने विकेंद्रित उद्योग व सेवा यांच्या नवीन संधी सूक्ष्म, लहान व श्रमप्रधान उद्योगांत विकसित कराव्या लागतील असे त्यांचे म्हणणे आहे...
पिसईचे क्रियाशील सरपंच वसंत येसरे
पिसई गावचे सरपंच वसंत येसरे कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून गावाच्या विकासासाठी क्रियाशील आहेत. त्यांनी पिसई गाव हे सुजलाम सुफलाम व्हावे, यासाठी जलव्यवस्थेची चोख कामे केली आहेत. ते सरकारी योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळवून देण्यासाठी तत्पर असतात...
राजुरी गावचे रोजचे उत्पन्न, वीस लाख ! (Rajuri)
राजुरी हे कोरडवाहू गाव आहे. ते पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात पूर्वेला आहे. तेथे वार्षिक चारशेपन्नास ते पाचशे मिलिमीटर पाऊस पडतो. शेती हा तेथील प्रमुख...
वैष्णवधाम – आदर्श गावाचा आगळा प्रयोग (Vaishnavdham)
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव निसर्गाच्या कोपाने नेस्तनाबूत झाले. वैष्णवधाम हे गावही माळीण या गावासारखे; त्याच परिसरातील; तशीच पार्श्वभूमी असलेले छोटेसे खेडे....
पाटोदा – निवडक अकरातील एक गाव (Patoda)
पाटोदा गाव औरंगाबादपासून सात किलोमीटर अंतरावर आहे. ते औरंगाबाद जिल्ह्याच्या संभाजीनगर तालुक्यात येते. गावाची लोकसंख्या पुरुष एक हजार सहाशेचौपन्न आणि स्त्रिया एक हजार सहाशेशहाण्णव...
वयम सोबतचा कौस्तुभ आमटे यांचा प्रवास
बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीतील कौस्तुभ हे ‘समाजभान’ आणि ‘आनंदवन भूजल शाश्वत सहयोग’ या उपक्रमांद्वारे समाज जोडण्याचे व पाणीपुरवठ्याच्या संदर्भातील काम विशेष भर देऊन...
आनंदवाडी गावात स्त्रीराज!
आनंदवाडी गाव लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक तेथे बिनविरोध पार पडते. गावातील मंदिरात ग्रामपंचायत सदस्यांची निवड होते. गावक-यांनी गावात अभेद्य युतीतून काही...