Tag: ग्रंथाली
जामनेर – बागायती आणि सुसंस्कृत (Jamner – city with rich development and cultural activities)
जामनेर हा जळगाव जिल्ह्यातील एक प्रमुख तालुका आहे. तो जळगाव शहरापासून साधारणपणे छत्तीस किलोमीटर अंतरावर आहे. जामनेर तालुका पाचोरा, भुसावळ, बोदवड, जळगाव, बुलढाणा या गावांनी वेढलेला आहे. जामनेर तालुक्यात एकशेअठ्ठावन्न गावे आहेत. त्यांपैकी शेंदुर्णी, फत्तेपूर, तोंडापूर, कापुसवाडी, नेरी, पहूर, देऊळगाव, वाकडी ही मोठी अशी गावे आहेत. जामनेर हे गाव टेकडीवजा एका डोंगराच्या कोपऱ्यात पायथ्याशी वसले आहे. मात्र त्या डोंगराला सिद्धगड या भारदस्त नावाने संबोधले जाते. गाव सुखी, संपन्न आणि समृद्ध असे आहे. जामनेर गाव नदीमुळे दोन विभागांत विभागले गेले आहे- जामनेर आणि जामनेरपुरा. दोन्ही गावांना सांधण्यासाठी नदीवर दोन ठिकाणी पूल बांधलेले आहेत. नदीचे नाव कांग असे आहे...
सर्जनशील शेगाव – कवितेचे घर आणि स्व-विकास ग्रूप असलेले (Innovative Shegaon’s House of Poetry...
व्यक्त होणे हे मनमोकळ्या स्वभावाचे लक्षण असते. छोट्या मुलांना आणि स्त्री-पुरुषांना अभिव्यक्तीचे व्यासपीठ निर्माण करून देणारे श्रीकांत पेटकर आणि त्यांचे बंधू किशोर यांनी त्यांच्या शेगाव बुद्रुक या गावी ‘कवितेचे घर’ची स्थापना केली आहे. त्याबरोबर आपण जेथे राहतो, तेथे अर्धवट अशी सार्वजनिक सरकारी कामे पडलेली असतात...रस्ते नाहीत, खड्डे-गटार नाही, पाणी नाही अशा अनंत सरकारी गैरसोयी ! त्यावर कोणी तरी येऊन ते काम करेल अशी वाट न पाहता, त्यांनी निर्माण केलेला अनुकरणीय असा ‘व्हॉट्सॲप’वरील ‘विकास ग्रूप’...
बोजेवार आणि अध्वर्यू
थिंक महाराष्ट्र’चे संपादक दिनकर गांगल यांनी संस्कृतिकारण हा शब्द मराठीत रूढ केला. तो त्यांनी ‘ग्रंथाली’च्या ग्रंथप्रसार यात्रेत 1982 साली प्रथम वापरला. त्या यात्रेची भूमिकाच साहित्यातील संवाद व समन्वय अशी होती. त्या धर्तीचे बरेच कार्यक्रम त्या यात्रेत आणि ‘ग्रंथाली’च्या नंतरच्या ग्रंथएल्गार, संवादयात्रा, ग्रंथमोहोळ, वाचकदिन अशा विविध उपक्रमांमध्ये होत गेले...
शिक्षकांनो, आत्मविश्वास पेरते व्हा!
मला महाराष्ट्रातील विविध शाळांमधून फिरत असताना एक सर्वसमान समस्या जाणवली, ती म्हणजे, मुलांना लिहिता-वाचता येत नाही! ती फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. शासनातर्फे अनेक प्रयत्न...
गर्जे मराठी – मराठीपणाचा वैश्विक विस्तार!
बोईंग इंटरनॅशनल विमान कंपनीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट डॉ. दिनेश केसकर भेटले.
लोखंडाच्या मळीपासून रनवे आणि हायवे बनवण्याचे तंत्रज्ञान शोधणारे, ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान, Order of...
बलुतंची चाळिशी आणि ग्रंथालीची सार्थकता
एखाद्या साहित्यकृतीची पंचविशी-चाळिशी-पन्नाशी किंवा शतक महोत्सव साजरा होण्याचे भाग्य जगात फार कमी साहित्यकृतींच्या वाट्याला आले आहे. मराठीत तर ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच आहे....
दया पवार यांच्या बलुतंची चाळिशी!
पुस्तकाची चाळीशी! अशी घटना मराठी साहित्यविश्वात बहुधा प्रथम घडत असावी. दया पवार यांच्या ‘बलुतं’ला चाळीस वर्षें झाली. ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’, ‘दया पवार प्रतिष्ठान’ व...
बलुतं – एक दु:खानं गदगदलेलं झाड!
मनुष्यसमाज, निसर्ग आणि नियती यांनी निर्माण केलेल्या नाना प्रकारच्या दु:खांनी गदगदलेल्या दगडू मारुती पवार नावाच्या माणसाची बलुतं ही एक आत्मकथा आहे. महार जातीच्या आई-वडिलांपोटी...
मुहूर्त मराठी विद्यापीठाचा – उद्देश संस्कृतिसंवर्धनाचा
जागतिकीकरणाच्या काळात मराठी समाजाच्या वृत्तिप्रवृत्ती, स्वभावविशेष, सवयी, इच्छाआकांक्षा जपल्या तर जाव्यातच; पण त्याबरोबर त्यांना जागतिक चित्रात अढळ व अव्वल स्थान मिळावे ही भावना स्वाभाविक...
डॉ. द.बा. देवल – जीवनशैलीचा पाठ
डॉ. द.बा. देवल यांना बाबा किवा फकीर म्हणावे अशी जीवनशैली ते निवृत्तीनंतर जगत आहेत. त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्ताने त्यांचा नागरी सत्कार इंदूरमध्ये काही वर्षांपूर्वी करण्यात आला....