Tag: गिरीश घाटे
ग्रंथालये नव्हे, सांस्कृतिक केंद्रे ! (Book Libraries will be cultural Centers)
पुस्तकांचा संग्रह आणि त्यांची देवघेव करण्याचे ठिकाण म्हणजे ग्रंथालय, एवढाच विचार लोकमानसात असतो. परंतु बदलत्या काळ-परिस्थितीत ग्रंथालयांना तेवढेच कार्य करून पुरेसे ठरणार नाही. त्यांना सांस्कृतिक केंद्राचे नवे, विस्तारित रूप घ्यावे लागेल. तेथे केवळ वाङ्मय नव्हे तर विविध विद्याशाखांचा पाठपुरावा करावा लागेल- वेगवेगळी माध्यमे वापरावी लागतील- ज्ञान संकलन व ज्ञान प्रसारण हे त्यांचे मुख्य कार्य राहील असा अभिप्राय चिपळूण येथे ‘लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर’ आणि ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ यांनी आयोजित केलेल्या ‘ग्रंथालय मित्र मंडळ’ मेळाव्यात व्यक्त झाला...
रामानंद तीर्थ आता संकेतस्थळावर ! (Website for Ramanand Tirth’s Birth Centenary)
रामानंद तीर्थ यांच्यावरील संकेत स्थळाची निर्मिती हा व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनच्या ‘महाभूषण’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा एक भाग आहे. किबहुना, त्या प्रकल्पाचा प्रारंभही या संकेतस्थळाने होत आहे. त्यांच्या जन्मदिवशी, 3 ऑक्टोबर 2024 ला व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनने तयार केलेल्या स्वामीजींवरील संकेतस्थळाचे प्रकाशन अंबाजोगाई येथे होत आहे. सोहळा ‘स्वामी रामानंद तीर्थ व हैदराबाद मुक्ती संग्राम स्मृती स्थळ’ येथे होणार आहे. हा कार्यक्रम शिक्षणतज्ज्ञ आणि स्वामीजींच्या चरित्राचे अभ्यासक प्राध्यापक डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. संकेतस्थळ गिरीश घाटे यांनी तयार केले आहे. ते हैदराबाद स्वातंत्र्यलढ्याचे अभ्यासक आहेत...
थिंक महाराष्ट्र च्या वर्धापन दिनी तीन पुस्तकांचे प्रकाशन
लेखनावर अथवा कलाविष्कारावर सद्यकाळात कोणतेही बंधन जाणवत नाही असा स्पष्ट निर्वाळा लेखक-अभिनेते अभिराम भडकमकर आणि नाट्यदिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी व्यक्त केला. ते ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या वर्धापनदिन कार्यक्रमातील परिसंवादात बोलत होते. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’संचालित ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलचा चौदावा वर्धापनदिन अर्थात ‘सद्भावना दिवस 2024’, ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात झाला. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा चांगुलपणा आणि त्याची प्रज्ञा-प्रतिभा ह्या ‘नेटवर्क’मध्ये नव्या-जुन्या पिढीतील सर्वांनी त्यांच्या लेखणीने, विचारांनी आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांतूनही योगदान द्यावे असे आवाहन ह्या वेळी करण्यात आले...
रावसाहेब (A Book on History of Hyderabad Freedom Struggle)
एकोणिसावे शतक संपत आले होते. हैदराबाद राज्यातील हिंदू जनतेचे आत्मतेज जागृत करून विविध क्षेत्रात त्यांना कार्य प्रवृत्त करण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या पहिल्या फळीतील एक नेते होते न्यायमूर्ती केशवराव कोरटकर. त्यांच्या सहकार्याने येथे मराठी शाळा सुरू झाली. 'निजाम विजय'सारखे वर्तमानपत्र निघाले. मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना झाली. त्यांनी विधवा पद्धतीला विरोध करत स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. हिंदू समाजाला स्वातंत्र्याचे स्वतःचे भान देणाऱ्या केशवराव कोरटकर यांचा परिचय मात्र हैदराबादमधील मराठी लोकांनाही नाही आणि महाराष्ट्रासाठी तर त्यांचे कार्य अपरिचितच आहे...