गोळवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यात वसलेले एक छोटेसे गाव. ते मालवणपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. ते सुंदर निसर्गाने नटलेले आहे. गावाच्या चारही बाजूंनी...
नासिकच्या महाजनपूरची ओळख ‘सैनिकांचे गाव’ अशी आहे. गावातील त्रेपन्न युवक लष्कराच्या विविध विभागांत कार्यरत आहेत. त्यांच्या सहकार्यातून मोफत लष्करी प्रशिक्षणाचा प्रकल्पही राबवला जात आहे....
महाजनपूर नावाचे गाव नासिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात येते. सध्या महाजनपूर, भेंडाळी अन् औरंगपूर ही तीन गावे म्हणजे नकाशावरील एक त्रिकोण आहे. त्या तिन्ही गावांचे...
सुर्डी हे सोलापूर जिल्ह्यातील गाव. तेथे दर दोन-तीन वर्षांनी दुष्काळ असतोच. यावर्षी मात्र गावाने दुष्काळी शिक्का पुसण्यासाठी एकजूट दाखवली. श्रमाची पूजा केली अन् झपाटून केलेल्या...
देवळे हे देवालयांचे गाव म्हणून संगमेश्वर तालुक्यात प्रसिद्ध आहे. त्या गावात खडगेश्वर, गावदेवी काळेश्वरी, विठ्ठल मंदिर, भैरी भवानी, रवळनाथ, श्रीकृष्ण, गणेश, मारुती पार, कालिका...
विरगाव हे नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील पाच हजार लोकवस्तीचे गाव. ते विंचूर - प्रकाशा या महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक 17 वर वसलेले आहे. गावची...
गावाला पूर्वी शीव असायची. गावातून बाहेर पडायला दरजा (दरवाजा) असायचा. गावाच्या आजूबाजूला कोट म्हणजे भिंत असायची. अथवा गावातील घरांची रचना अशी असायची, की घराच्या...
देवरूखबद्दल असे सांगितले जाते, की प्रत्यक्ष देवांच्या वास्तव्याने ती भूमी पावन झाली आहे! बहिणाईने ‘देऊळातल्या देवा या हो, उतरा ही पायरी’ असे आळवूनसुद्धा जे देव भूतलावर थांबले नाहीत, ते देव स्वेच्छेने ज्या ठिकाणी राहून गेले ते गाव म्हणजे देवरूख! देवरुख या गावाचा तालुका संगमेश्वर असला तरी तालुक्याचे गाव म्हणून ओळख आहे ती देवरुख ह्या शहराचीच; असे महत्त्व त्या शहरास लाभले आहे. देवरूख या नावाची उत्पत्ती आणखी एका पद्धतीने आहे. वड आणि पिंपळ यांची मोठमोठी झाडे त्या गावाच्या चारही बाजूंना आहेत. वड आणि पिंपळ यांना भारतीय संस्कृतीत ‘देववृक्ष’ मानले जाते. ‘देववृक्षांचे गाव’ याचा अपभ्रंश होत होत गावाचे नाव ’देवरूख’ झाल्याचे सांगितले जाते...