Tag: गाडगेबाबा
शोध गाडगेबाबांचा (Gadgebaba the social Reformer)
गाडगेबाबांचा उल्लेख संत, समाजसुधारक, प्रबोधनकार, कर्मयोगी अशा अनेक प्रकारे केला जातो. मात्र तो माणूस अध्यात्माच्या नावाखाली पोपटपंची करणारा हभप नव्हता. त्यांचे कीर्तन माणसांच्या मन आणि मेंदू यांना प्रथा, परंपरा, कर्मकांड यांचे जे झापड लागले आहे, ते दूर करणारे होते...
गाडगेबाबांच्या… बालपणीच्या पाऊलखुणा शोधताना
अमरावती जिल्ह्यातील ‘शेंडगाव’ हे गाडगेबाबांचे जन्मगाव. गाडगेबाबांनी बालवयातील 1876 ते 1884 पर्यंतचा काळ तेथे व्यतीत केला. अमरावती ते शेंडगाव हे अंतर सत्तर किलोमीटरचे. डेबूच्या पाऊलखुणा इतरत्र दिसतात का ते शोधण्यासाठी गावात निघालो असता बाहेर एक तरूण भेटला. तो जानोरकर परिवारातील होता. त्याला गाडगेबाबांविषयी माहिती त्रोटक होती. त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. तो शेती करतो. ज्या गाडगेबाबांनी त्यांचे आयुष्य शिक्षणाच्या प्रचार-प्रसारासाठी खर्ची घातले त्या दस्तुरखुद्द गाडगेबाबांच्या गावात आणि परिवारात शिक्षणाबद्दल ही अनास्था...
गाडगेबाबांची कीर्तनाभाषा
गाडगेबाबांची कीर्तनभाषा ही जनभाषा आहे. संवाद हा त्या भाषेचा गाभा. ते एकेका शब्दाचा प्रश्न लोकांना विचारत आणि लोकांचा होकार मिळवत. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे विषय स्वच्छता, जातिनिर्मूलन, अस्पृश्यतानिषेध, गरिबांना मदत, व्यसनमुक्ती, प्राणिमात्रदया, अन्न-वस्त्र-निवारा-विचार, शिक्षण, ज्ञान हे मुख्यतः आहेत. ते शिक्षणाला अग्रस्थान देतात...