नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातील साल्हेर आणि मुल्हेर हे दोन आवळे जावळे किल्ले, महाराष्ट्र आनि गुजरातच्या सीमेवर वसलेले आहेत. पैकी साल्हेर हा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त...
‘रामगड’ हा किल्ला दापोली-खेड तालुक्याच्या सीमेवर आहे. तो खेडपासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे. तो साने गुरुजींच्या ‘पालगड’ गावाच्या पूर्वेस आहे. तो किल्ला ‘रामदुर्ग’ या नावानेही ओळखला जातो. तो समुद्रसपाटीपासून साधारण चारशेआठ मीटर उंचीवर आहे. किल्ला अदमासे एक एकर जागेवर उभा आहे. तो पालगडचा जोडकिल्ला मानला जातो. त्यामुळे तो अज्ञात व म्हणून अप्रसिद्ध होता. त्या किल्ल्याची स्थाननिश्चिती कागदपत्रांच्या आधारे प्रस्तुत लेखकाने केली आहे...
मंदार अनंत भारदे नावाचा शेवगावकर तरुण विमाने आणि हेलिकॉप्टर्स भाड्याने देतो; त्याच्या स्वत:च्या मालकीची विमाने आणि विमान उड्डाण कंपनी आहे. त्याने ‘मंदार अनंत भारदे’ या त्याच्या नावातील आद्याक्षरे घेऊन कंपनी स्थापन केली आहे - Mab एव्हिएशन !
निसर्गसौंदर्याने नटलेले अंजनवेल गाव पर्यटकांना जास्त आकर्षित करते, ते गावातील गोपाळगड, दीपगृह व श्री टाळकेश्वर मंदिर या स्थळांमुळे ! गावाला लाभलेला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, मनाला भुरळ घालणारा समुद्र व आजुबाजूचा विलोभनीय परिसर शब्दातीत आहे…
अजय गाडगीळ यांच्याकडे गीर्यारोहण क्षेत्रातील एक उगवता तारा म्हणून पाहिले जाते. सह्याद्री पालथा घालणारा हा मावळा गिर्यारोहण, गड-किल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन, निसर्गरक्षण आणि आपत्कालीन बचावकार्य यालाच ध्येय मानून त्या दिशेने यशस्वी घोडदौड करत आहे...
भवानीगड हा भुईकोट ह्या प्रकारात येणारा किल्ला आहे. किल्ले भवानीगड हा शिवकाळात टेहळणी गड म्हणून महत्त्वाचा होता. त्या गडाच्या आसपास किल्ले महिपतगड आणि किल्ले प्रचीतगड हे दोन महत्त्वाचे किल्ले येतात. तसेच, राणी येसुबार्इंचे माहेर असलेले शृंगारपूर गाव आणि संभाजी राजांच्या कारकिर्दीत सरसेनापती असलेले म्हाळोजी घोरपडे यांचे कारभाटले ही गावेही हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे किल्ले भवानीगड त्या सगळ्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी उपयोगात येत असे...