Tag: गजानन महाराज
गजानन महाराज – नरसिंग महाराज स्नेहबंध !
महाराजांच्या घरी श्रीमंती होती. त्यांच्याकडे मूळ गावी शेकडो एकर जमीन होती. पुढे ते आकोटला आले व आकोटचे नरसिंग महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. गजानन महाराज हे नरसिंग महाराज यांना त्यांचे बंधू मानत असत. ते त्यांचे पट्टशिष्य भास्कर महाराज यांना समवेत घेऊन आकोटला नरसिंग महाराज यांना भेटण्यास येत असत. भास्कर महाराज हे नरसिंग महाराज यांचे पूर्वीचे नातेवाईकच होते. नरसिंग महाराज आकोट जवळच्या अरण्यात एकांतवासात राहात असत. तेथे मोठमोठे वृक्ष असल्याचे वर्णन त्याच ग्रंथात व त्याच अध्यायामध्ये आहे...
संत गजानन महाराज – शेगावीचा राणा (Saint Gajanan Maharaj of Shegaon)
शेगावचे मूळ नाव शिवगाव. ते शिवगाव असे तेथील प्रसिद्ध शिवमंदिरामुळे प्रथम पडले. त्या शिवगावचे झाले शेगाव. शृंग ऋषींनी वसवलेले गाव म्हणून शेगाव अशीही एक व्युत्पत्ती आहे. शेगाव हे वऱ्हाडातील बुलढाणा जिल्ह्यातील गाव. ते तालुक्याचे ठिकाण आहे. संत गजानन महाराज तेथे आल्यामुळे शेगावला देशभर अफाट प्रसिद्धी मिळाली आहे. शेगाव नगरी म्हणजे शिस्त, स्वच्छता आणि सुंदर नियोजनाचे उत्तम उदाहरण...
श्री दत्त मंदिर: अचलपूरचा भुलभुलैया (Shri Datta Temple of Achalpur)
अचलपूर येथील दीडशे वर्षे जुने दत्त मंदिर हे भुलभुलैया मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराला धार्मिकतेबरोबर ऐतिहासिक व प्राचीन महत्त्व आहे. मंदिराचे बांधकाम शेसव्वाशे वर्षांपूर्वीचे असावे...
श्रद्धेचे व्यवस्थापन – श्री गजानन महाराज संस्थान
मी शेगावला कामानिमित्त जाणार आहे, असे बायकोला सांगितल्यावर तिने सात्त्विक राग व्यक्त केला. मग म्हणाली “मी महाराजांची पोथी वाचते आणि तुला महाराज बोलावतात. हे...