Tag: कोळबांद्रे
गंगा आली रे… कोळबांद्र्याचे पाणी
कोळबांद्रे या खेडेगावातील बारा वाड्यांपैकी कुंभारवाडीने वाडीच्या पाणी पुरवठ्याचे चित्र बदलले ते प्रकाश गुंदेकर यांच्या पुढाकाराने ! वाडी बासष्ट कुटुंबांची आहे. त्या सर्वांनी पाणीपुरवठ्याच्या कल्पनेचे स्वागत व समर्थन केले. रानातील पाणी वाडीत आले ! वाडीच्या या प्रयत्नांना ‘शिवतरुण मित्र मंडळ’ कारणीभूत ठरले...
कोळबांद्र्याच्या डिगेश्वराचा आनंदोत्सव !
भारताच्या सात लाख खेडेगावांमध्ये महादेवाचे मंदिर नाही असे गाव नसेल ! महादेवाच्या त्या मंदिरांतील भगवंताचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गावातील महादेवाला वेगवेगळे नाव आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे महाराष्ट्राच्या पोलिस खात्याचे घोषवाक्य आहे. कोळबांद्रे गावातील डिगेश्वरही नेमके तेच काम करतो. गावात कोणी गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल माणसाला त्रास दिला तर ‘आता डिगेश्वराला नारळ देईन’ एवढे वाक्य जरी त्या गरीब माणसाने उच्चारले तरी तो दुष्ट घाबरून जातो...
कोळबांद्र्याच्या डिगेश्वराचा जन्म
दापोली तालुक्याच्या कोळबांद्रे गावात शंकराची पिंडी एका ढिगातून वर आली. ‘ढीग’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘डिग’ असा शब्द निर्माण झाला. त्यामुळेच त्या मंदिराला ‘डिगेश्वर मंदिर’ असे संबोधले जाऊ लागले. ब्रिटिश कालीन ह्या मंदिराचा 2015 साली जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरात असलेला नक्षीदार घुमट, मंदिरासमोरील त्रिपुर यामुळे मंदिरा भोवतीचे वातावरण तेजोमय वाटते...