Home Tags केळशी

Tag: केळशी

केळशीच्या रमलखुणा

पूर्वीच्या काळी गाव, गावाकडची संस्कृती, गावची अर्थव्यवस्था कशी होती याचे प्रातिनिधिक रूप म्हणजे केळशी. गावाकडचे निसर्गसौंदर्य, तेथील लोकजीवन आणि त्यातील वेगळेपण हे सगळेच भूरळ घालणारे होते. आज गावे शहरीकरणामुळे सुधारली. पूर्वीच्या गावांबाबत अनभिज्ञ असलेल्या आजच्या पिढीला जुन्या गावची सैर केळशी या गावातून घडेल...

केळशी गावचे पारंपरिक खाद्यपदार्थ

महाराष्ट्रात प्रत्येक पट्ट्याची खास खाद्यसंस्कृती आहे. त्यात प्रामुख्याने कोकणी, पुणेरी, मराठवाडी, कोल्हापूरी, खान्देशी, वऱ्हाडी या म्हणता येतील. कोकणात नारळ व तांदूळ मुबलक उपलब्ध असल्यामुळे तेथील पारंपरिक खाद्यपदार्थांत खोबरे व तांदूळ यांपासून बनवलेले पदार्थ जास्त आढळतात...

पंचांग – टिळक की दाते (Lokmanya Tilak Reforms Indian Traditional Almanac)

पंचांग हे नुसते ग्रहताऱ्यांचे गणित नसून ते धर्मशास्त्राशी जोडलेले आहे. महाराष्ट्रात सध्या जी पंचांगे प्रामुख्याने वापरात आहेत ती म्हणजे दाते, कालनिर्णय, निर्णयसागर, महाराष्ट्र पंचांग, रूईकर, लाटकर आणि टिळक पंचांग. त्यांतील शेवटचे, टिळक पंचांग यास वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे...

केळशी महालक्ष्मी मंदिर – मोगलकालीन प्रभाव(Mahalaxmi Temple at Kelshi)

रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील महालक्ष्मी मंदिराची जी इमारत आहे, तिच्यावर दाक्षिणात्य आणि मोगलकालीन कलेचा ठसा आढळतो. तेथील ध्वनीवर्धन, उगवतीच्या व मावळतीच्या सूर्यकिरणांचा देवीच्या चरणांना होणारा स्पर्श, झरी, पोळी या आगळ्यावेगळ्या गोष्टी मंदिराचे सौंदर्य वाढवतात...

केळशी देवीचा उत्सव : समाजजीवनाचे प्रतिबिंब

केळशीच्या महालक्ष्मी मंदिराचा उत्सव खूपच मोठा असतो. मंदिर हा पेशवेकालीन वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. उत्सवास केवळ धार्मिक स्वरूप नाही; तर त्यातून केळशी गावाचे समाजजीवन प्रतिबिंबित होते. उत्सव चैत्रशुद्ध अष्टमी ते पौर्णिमा या कालावधीत होतो.