Tag: कृष्णा नदी
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर
पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पूर्व क्षितिजावर आलेला चंद्र आकाशात वर येऊ लागतो आणि पूर्वाभिमुख असलेल्या कोपेश्वर मंदिरावर त्याची किरणे पडू लागतात. मंदिर शुभ्रधवल चंद्रप्रकाशाने उजळू लागते. शरद ऋतूमधील आल्हाददायक चैतन्यमय वातावरण आणि त्रिपुरी पौर्णिमेचे टिपूर चांदणे उल्हसित करणारे भासते. त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री तारकाकृती मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या छतावरील वर्तुळाकार झरोक्यातून चंद्रकिरण मंदिरात आत प्रवेश करतात. झरोक्याखाली असलेली रंगशिळा चंद्रप्रकाशात उजळून जाते. वर्षातून एकदा, फक्त त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री काही घटिकांपुरता होणारा हा सोहळा कोपेश्वर मंदिराचे सौंदर्य अंतर्बाह्य खुलवतो. हे प्राचीन शिव-विष्णू मंदिर शिल्पकृतींनी संपन्न आहे...
ऐसे उगार माझे गाव ! (Ugar – My town)
उगार खुर्द हे भूतपूर्व सांगली संस्थानातील छोटेसे खेडेगाव. गाव स्वतंत्र भारतात गेल्या पाऊणशे वर्षांत पूर्ण पालटून गेले आहे. मूलत: दक्षिणवाहिनी असणारी कृष्णा नदी उगारजवळ उत्तर वाहिनी होते. अशा वळणाला तीर्थक्षेत्र मानले जाते. त्यामुळे नदीला प्रशस्त दगडी घाट वरपासून खाली, अगदी पात्राच्या मध्यभागापर्यंत आहे. शंभर वर्षे झाली तरी त्या घाटाचे बांधकाम अभंग आहे. उगार खुर्दला भाषिक सलगतेच्या तत्त्वावर सीमेलगतचे गाव म्हणून राज्य सरकारने भाषिक सवलती दिल्या आहेत...
संगम माहुली
संगम माहुली या गावी मराठा इतिहासाच्या खुणा आढळतात. ते ठिकाण साताऱ्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. ते कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर असल्यामुळे त्या गावाचे दोन भाग पडतात - अलीकडे 'संगम माहुली' आणि पलीकडे 'क्षेत्र माहुली'. छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाधी संगम माहुली येथे नदीच्या काठी आहेत...