‘पवतं’ बांधण्याची परंपरा कोकणसह महाराष्ट्रभर अनेक गावांत सुरू आहे. ‘पवतं’ म्हणजे पवित्र रक्षक धागा. हाताला गंड्याचा दोरा, कंबरेला करगोटा बांधतात तसे. पवत्यांचे उल्लेख वेगवेगळ्या पद्धतींसह आढळतात.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेली, छत्रपती शिवाजी राजांना ‘भवानी’ तलवार प्रदान करणारी, त्यांची प्रेरणाशक्ती, तुळजापूरची ‘तुळजाभवानी’ अनेकांची आराध्य दैवत आहे. भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत धावणारी ती...
दधिमती माता ही सोलापूरातील दाधीच समाजाचे कुलदैवत म्हणून ओळखली जाते. सोलापूर शहरातील चाटीगल्ली परिसरात दाधीच समाजाचे मंदिर आहे. तेथे दधिमती मातेची मूर्ती आढळते. नवरात्रात...
सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अंकोली गावामध्ये सातशे वर्षापूर्वीचे भैरवनाथांचे मंदिर आहे. मोहोळ-मंगळवेढा मार्गावर अंकोली स्टॉप आहे. अंकोली पंढरपूर-सोलापूर (ति-हेमार्गे) पंढरपूरपासून एकोणिसाव्या मैलावर आहे. रस्ता...