Tag: कविठा बुद्रुक
महानुभाव पंथीयांचे पूजनीय अचलपूर
अचलपूर तालुका हा महानुभाव पंथीयांसाठी श्रद्धास्थान आहे. त्यांच्या पवित्र जागा तालुक्यात अनेक आहेत- अष्टमहासिद्धी, वडनेर भुजंग, असदपूर, काकडा, अचलपूर शहरातील रत्नपूजा, निर्वाणेश्वर, बोरबन, पिंगळभैरव, लाखबन, देव्हार चौकी, अंबीनाथ, सोमनाथ ही ती श्रद्धास्थाने. महानुभावांना स्थान म्हणजे परमेश्वर अवताराच्या स्पर्श सबंधाने पवित्र झालेले ठिकाण. एकूण अकरा प्रकार स्थानासबंधी आहेत...
परंपरा जपणारे शिंदी बुद्रुक
चक्रधर स्वामी यांचे वास्तव्य लाभलेले, ग्रामदेवता मरिआईची मिरवणूक, 'द्वारकाच्या बैला'ची मिरवणूक, श्रावणात घरोघरी केल्या जाणाऱ्या 'माळी पौर्णिमे'ची पूजा अशा अनेक आगळ्यावेगळ्या प्रथा, परंपरा, उत्सव जोपासणारे, एकेकाळी अजरामर संगीत नाट्यकलावंत घडवून ‘नाटकांची शिंदी’ म्हणून ओळख निर्माण केलेले, 'शिक्षकांचे गाव' अशी वैविध्यपूर्ण ओळख असलेले अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील गाव म्हणजे ‘शिंदी बुद्रुक’...
जुळे हनुमान, हिंदू-मुस्लिमांना प्रिय !
जुळे हनुमान मंदिर अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यात येते. मंदिरातील जुळ्या हनुमान मूर्ती हिंदू व मुस्लिम, दोन्ही संस्कृतींत श्रद्धेने पूजल्या जातात ! आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भागातील मुस्लिम बंधू ‘हनुमान’ ही त्यांच्या जातीतील देवता आहे असे म्हणतात. त्यामुळे जुळे हनुमान मंदिर मुस्लिम बांधवांनाही हिंदूंएवढेच वंदनीय आहे...