देविदास गुंजकर या शिक्षकांकडे सहा हजार शिक्षकांनी जाऊन त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे ! ते कसले? तर पहिलीचे विद्यार्थी दहावीच्या पुस्तकातील शब्द कसे लिहू शकतात ते रहस्य त्यांनी सांगावे याबाबतचे. शिक्षक चांगली शाळा बघण्यासाठी गावोगावी जात असतात, पण सहा हजार शिक्षक दिवसभर थांबून दुसऱ्या शिक्षकाकडून अध्यापन तंत्र जाणून घेत आहेत हे प्रथमच घडत आहे...