- वि.वा.शिरवाडकर आणि त्यांनी लिहिलेले ‘नटसम्राट’ हे नाटक या दोहोंबद्दल अपार भक्तिभाव मराठी प्रेक्षकांच्या मनात दिसतो. पण बरेचदा नाटकाचीच मोजपट्टी लावून नटसम्राट चित्रपटाचे मूल्यमापन केले जाते आणि घोटाळा तेथेच होतो...
मराठी संगीत रंगभूमी ही महाराष्ट्रीय मनाच्या मर्मबंधातील ठेव आहे. त्यामुळे पद्याला, संगीतकलेला रंगभूमीचे अधिष्ठान मिळाले आणि तो वेलू जो गगनावेरी गेला, तो अनेक वळणे घेत, चढउतार अनुभवत, आजतागायत लोकप्रियतेच्या किमान पातळीवर राहिला.